बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 19:19 IST2026-04-09T19:18:27+5:302026-04-09T19:19:44+5:30

Royal Enfield Flying Flea C6 भारतात लाँच. BaaS पर्यायासह किंमत १.९९ लाख. १५४ किमी रेंज आणि प्रगत फीचर्ससह रॉयल एनफील्डची पहिली EV.

Bullet is here! First electric bike Royal Enfield Flying Flea C6 launched; You will be amazed by the price and features | बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क

बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क

बुलेट प्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. दिग्गज दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफील्डने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक 'फ्लाइंग फ्ली सी६' अधिकृतपणे लाँच केली आहे. आकर्षक रेट्रो लूक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेल्या या बाईकने ऑटो मार्केटमध्ये खळबळ माजवून दिली आहे.

काय आहे 'Flying Flea C6' ची किंमत?
रॉयल एनफील्डने आपल्या या पहिल्या इलेक्ट्रिक अवताराची सुरुवातीची किंमत १.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये ही एक स्पर्धात्मक किंमत मानली जात आहे, ज्यामुळे सामान्य ग्राहकांनाही प्रीमियम इलेक्ट्रिक बाईकचा अनुभव घेता येईल. तसे पहायला गेल्यास 'Flying Flea C6' ची एक्स-शोरूम किंमत २.७९ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

वेग आणि बॅटरी क्षमता
बॅटरी: या बाईकमध्ये ३.९१ kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

रेंज: एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक १५४ किमी (IDC) पर्यंत धावू शकते.

वेग: ही बाईक केवळ ३.७ सेकंदात ० ते ६० किमीचा वेग पकडते, तर याचा टॉप स्पीड ११५ किमी प्रति तास आहे.

चार्जिंग: हाय-स्पीड चार्जरच्या मदतीने बॅटरी २०% वरून ८०% पर्यंत केवळ ६५ मिनिटांत चार्ज होऊ शकते.

विशिष्ट डिझाइन आणि फिचर्स
या बाईकचे डिझाइन दुसऱ्या महायुद्धातील मूळ 'Flying Flea' वर आधारित आहे. यात अल्युमिनियम फोर्ज्ड गर्डर फोर्क्स आणि मॅग्नेशियम बॅटरी केसिंग देण्यात आले आहे. तसेच, सुरक्षेसाठी कॉर्नरिंग ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल यांसारखे प्रीमियम फिचर्सही समाविष्ट करण्यात आले आहेत.

रॉयल एनफील्डची सर्वात 'लाईट' बाईक
या बाईकचे डिझाइन जुन्या 'फ्लाइंग फ्ली'पासून प्रेरित आहे. वजनाच्या बाबतीत ही रॉयल एनफील्डची आतापर्यंतची सर्वात हलकी बाईक ठरली आहे. बॅटरीसाठी खास अ‍ॅल्युमिनियम बॉक्स वापरल्यामुळे आणि इतर हलक्या धातूंच्या वापरामुळे या बाईकचे वजन फक्त १२४ किलो आहे.

अत्याधुनिक फीचर्स
डिजिटल डिस्प्ले: गुगल नेव्हिगेशन सपोर्टसह स्मार्ट कन्सोल.

कनेक्टिव्हिटी: वायरलेस फोन चार्जिंगची सुविधा.

सुरक्षा: कॉर्नरिंग ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल यांसारखे प्रगत सुरक्षा फीचर्स.

राइडिंग मोड्स: यात 'स्पोर्ट' आणि 'इंडिविज्युअल' असे दोन मोड्स दिले आहेत. इंडिविज्युअल मोडमध्ये रायडर आपल्या आवडीनुसार बाईकची पॉवर आणि ब्रेकिंग सेट करू शकतो.

Web Title : रॉयल एनफील्ड ने लॉन्च की 'फ्लाइंग फ्ली सी6' इलेक्ट्रिक बाइक: कीमत और विवरण

Web Summary : रॉयल एनफील्ड ने अपनी पहली इलेक्ट्रिक बाइक 'फ्लाइंग फ्ली सी6' लॉन्च की, जिसकी कीमत ₹1.99 लाख है। यह 154 किमी की रेंज, 115 किमी प्रति घंटे की टॉप स्पीड, रेट्रो डिजाइन, आधुनिक सुविधाओं और 124 किग्रा के हल्के वजन के साथ आती है।

Web Title : Royal Enfield Launches 'Flying Flea C6' Electric Bike: Details & Price

Web Summary : Royal Enfield debuts 'Flying Flea C6', its first electric bike, priced at ₹1.99 lakh. It boasts 154km range, 115kmph top speed, retro design, advanced features and lightweight build, weighing only 124 kg.