शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

बदललेल्या जगातील रस्त्यांवर उतरण्यासाठी बीएमडब्ल्यू #JustCantWait

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 13:20 IST

#JustCantWait च्या माध्यमातून कंपनीकडून संवाद साधणाऱ्या पहिल्या मोहिमेची सुरुवात

कंपनीची सुधारित ओळख दर्शवण्यासाठी बीएमडब्ल्यू कंपनीनं नव्या लोगोचं अनावरण केलं आहे. हा नवा बदल डिजिटलायझेशनचा भाग असून तो त्यांची सकारात्मकता, मोकळेपणा आणि स्पष्टता दाखवतो. १९१७ मध्ये लॉन्च झाल्यापासून लोगो रिडिझाईन करण्याची ही पाचवी वेळ आहे. ब्रँड अधिक ग्राहककेंद्री करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. नवा लोगो ब्रँडचं महत्त्व, वाहतूक क्षेत्राच्या भविष्यातील त्याची कालानुरुपता आणि ड्रायव्हिंगमधील आनंद दर्शवतो.

नवा बदल लक्षात घेऊन कंपनीनं भारतात #JustCantWait मोहिमेच्या माध्यमातून नव्या संवाद मोहिमेची सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमधून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींची मानसिकता ओळखून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे.#JustCantWait campaign मोहिमेचा भाग म्हणून बीएमडब्ल्यूनं एक प्रोमो व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. नव्या कलेक्शनच्या माध्यमातून कारप्रेमींना काय अनुभवता येईल, याची झलक व्हिडीओमधून पाहायला मिळते.या बदलांसोबत कंपनीनं नव्या मालकी योजनांच्या अंतर्गत अनेक आर्थिक सेवांच्या घोषणा केल्या आहेत. ग्राहकांना त्यांच्या आवडीची बीएमडब्ल्यू कार खरेदी करता यावी यासाठी बीएमडब्ल्यू इंडिया फायनान्शियल सर्व्हिसेसनं नवी 'इझी स्टार्ट' ऑफर जाहीर केली आहे. यामुळे कार खरेदीनंतर पहिली अडीच वर्ष ग्राहकांना भरावा लागणारा ईएमआय ४० टक्क्यांपर्यंत कमी असेल. याशिवाय शून्य टक्के डाऊन पेमेंटसह व्याज दर ५.९९ टक्के इतकाच असेल. या दोन्ही ऑफर ग्राहकांसाठी फायदेशीर असतील. कारण या कालावधीत ग्राहकांवरील आर्थिक भार कमी राहील. याशिवाय ग्राहकांना कोणत्याही शुल्काशिवाय त्यांची आवश्यकता आणि सोयीनुसार कर्जाची पुनर्रचना करता येईल. बीएमडब्ल्यू ३ सीरिज, बीएमडब्ल्यू ५ सीरिज, बीएमडब्ल्यू ६ सीरिजवर ही ५.९९ टक्क्यांची विशेष व्याजदराची ऑफर देण्यात आली आहे.
या फायद्यांसोबतच कारच्या देखभालीसाठी हायजीन पॅकेजेसदेखील देण्यात आले आहे. यामध्ये बीएमडब्ल्यू सर्व्हिस इन्क्लुसिव्ह, बीएमडब्ल्यू सर्व्हिस इन्क्लुसिव्ह प्लस आणि बीएमडब्ल्यू रिपेयर इन्क्लुसिव्हचा समावेश आहे. या पॅकेजेसमध्ये देखभाल आणि तपासणीचा समावेश आहे. ग्राहक त्यांच्या गरजेनुसार पॅकेज अपग्रेड करू शकतात किंवा त्याचा कालावधी वाढवू शकतात. याशिवाय बीएमडब्ल्यू इंडियानं डिजिटल खरेदीचा पर्यायदेखील आणला आहे. या माध्यमातून संभाव्य ग्राहकांना घरबसल्या पहिल्यांदाच कॉन्टॅक्टलेस अनुभव घेता येईल. या माध्यमातून संभाव्य ग्राहकांना नव्या आणि सेकंड हँड कार खरेदी करता येतील. कार देखभाल करणाऱ्या सेवा बुक करणं, सुरक्षितपणे पैसे भरणं यासारख्या सुविधा यामुळे एका क्लिकवर उपलब्ध होतील. या नव्या कॉन्टॅक्टलेस अनुभवामुळे कार बुक करताना आणि तिच्या देखभालीसाठी सर्व्हिसिंगची वेळ घेताना पारदर्शकता राहील.

टॅग्स :Bmwबीएमडब्ल्यू