शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

Upcoming Triumph Bike : ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल 765 रेंज बाईक पुढील महिन्यात लॉन्च होणार; जाणून घ्या काय असेल खास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 14:15 IST

Upcoming Triumph Bike : कंपनीने या बाईकसाठी देशभरातील डीलरशिपवर 50,000 रुपयांपासून बुकिंग सुरू केले आहे. या बाईकची डिलिव्हरी एप्रिल 2023 पासून सुरू होऊ शकते.

नवी दिल्ली : दुचाकी वाहने बनवणारी कंपनी ट्रायम्फ मोटरसायकल्सने पुढील महिन्यात देशात आपली स्ट्रीट ट्रिपल 765 रेंज लॉन्च करणार असल्याचा खुलासा केला आहे. ट्रायम्फने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती शेअर केली आहे. यासंदर्भात कंपनीने 2023 ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल 765 लाइन-अपचा टीझर रिलीज केला. कंपनीने या बाईकसाठी देशभरातील डीलरशिपवर 50,000 रुपयांपासून बुकिंग सुरू केले आहे. या बाईकची डिलिव्हरी एप्रिल 2023 पासून सुरू होऊ शकते.

काय असतील फीचर्स?ट्रायम्फ देशातील एकमेव स्ट्रीट ट्रिपल आर आणि आरएस आणणार आहे. या मॉडेल्समध्ये फीचर्स म्हणून 'माय ट्रायम्फ कनेक्टिव्हिटी सिस्टम'सह 5.0-इंचाचा टीएफटी इन्स्ट्रुमेंट कन्सोल पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये नेव्हिगेशन आणि म्युझिकसह इतर अनेक कामे ब्लूटूथ मॉड्यूलद्वारे करता येतात. आर व्हेरिएंटला रेन, रोड, स्पोर्ट आणि कस्टम असे चार राइडिंग मोड मिळतील, तर आरएस व्हेरिएंटला ट्रॅक मोड देखील मिळेल.

765 रेंज असलेले इंजिननवीन ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल 765 मध्ये बसवलेले इंजिन 12,000 आरपीएमवर 128 बीएचपीची कमाल पॉवर आणि 9,500 आरपीएमवर 80 एनएम कमाल टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंजिनसह एक बाय डायरेक्शन क्विकशिफ्टरसह नवीन एक्झॉस्ट असलेला 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

कशी असेल डिझाईन?या बाइकला अँगुलर डिझाईन देण्यात आले आहे, ज्यामध्ये नवीन ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल 765 मध्ये फ्रंटला बग-आय एलईडी हेडलॅम्प आणि 15-लिटरचे फ्यूल टँक दिसेल. 2023 ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल आर सिल्व्हर आणि व्हाइट या दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असणार आहे. स्ट्रीट ट्रिपल आरएस सिल्व्हर, रेड आणि यलो कलर स्कीममध्ये बाजारात येईल.

केटीएम 890 ड्यूकसोबत होईल स्पर्धाट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल 765 ची भारतीय बाजारपेठेत केटीएम 890 ड्यूकसोबत टक्कर असेल. ज्यामध्ये 889 सीसी इंजिन देण्यात आले आहे, जे 115ps/92 Nm आउटपुट जनरेट करण्यास सक्षम आहे.

टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहन