मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 20:48 IST2025-09-14T20:47:33+5:302025-09-14T20:48:16+5:30
हा बदल नुकत्याच लागू झालेल्या नवीन GST नियमांमुळे करण्यात आला आहे.

मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात विश्वासार्ह कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपल्या प्रीमियम MPV इन्व्हिक्टोच्या किंमतीत मोठी कपात जाहीर केली आहे. हा बदल नुकत्याच लागू झालेल्या नवीन GST नियमांमुळे करण्यात आला आहे.
हे मॉडेल्स झाले स्वस्त -
- झेटा+ (Zeta+) (7-सीटर आणि 8-सीटर व्हेरिएंट) – या कारच्या किंमतीत आता 54,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
- अल्फा+ (Alpha+) (7-सीटर व्हेरिएंट) – या कारवर ग्राहकांना सर्वाधिक फायदा मिळत आहे, कारण या कारच्या किंमतीत 61,000 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.
अशी आहे नवी किंमत -
कपातीनंतर अल्फा+ (Alpha+) 7-सीटर व्हेरिएंटची किंमत कमी होऊन आता ₹28.61 लाख (एक्स-शोरूम) राहिली आहे.
मारुती इन्व्हिक्टो ही आधीपासूनच एक आलिशान आणि स्टायलिश MPV म्हणून ओळखली जाते. आता किंमतीत झालेल्या या कपातीमुळे ही कार आणखी आकर्षक बनली आहे. जे ग्राहक कुटुंबासाठी प्रीमियम MPV खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी ही योग्य संधी असू शकते.
ग्राहकांना थेट फायदा -
GST दरांमधील बदलाचा थेट फायदा आता ग्राहकांना मिळत आहे. मारुती इन्व्हिक्टोच्या किंमतीतील ही कपात निश्चितच लोकांच्या खिशावरचा भार कमी करेल आणि कंपनीच्या विक्रीलाही चालना मिळू शकेल.