गाड्यांच्या सुरक्षेसाठी 'भारत NCAP 2.0' नियम लवकरच लागू; 'क्रॅश टेस्ट' आता कठीण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:16 IST2025-11-25T15:15:52+5:302025-11-25T15:16:14+5:30
bncap 2.0: नव्या नियमांमुळे आता कारची सेफ्टी रेटिंग काढण्याची पद्धत केवळ प्रौढ आणि बाल प्रवाशांच्या संरक्षणापुरती मर्यादित राहणार नाही, तर एकूण पाच सुरक्षा निकषांचा यात समावेश करण्यात आला आहे.

गाड्यांच्या सुरक्षेसाठी 'भारत NCAP 2.0' नियम लवकरच लागू; 'क्रॅश टेस्ट' आता कठीण...
केंद्र सरकारने भारतातील कारची सुरक्षा मानके वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना वाहनांच्या सुरक्षिततेबद्दल अधिक स्पष्ट माहिती देण्यासाठी 'भारत NCAP 2.0' आणण्याची तयारी सुरू केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नव्या नियमांचा मसुदा जारी केला आहे. ऑक्टोबर २०२७ पासून हे नवीन आणि अधिक कडक क्रॅश टेस्ट प्रोटोकॉल लागू होण्याची शक्यता आहे.
नव्या नियमांमुळे आता कारची सेफ्टी रेटिंग काढण्याची पद्धत केवळ प्रौढ आणि बाल प्रवाशांच्या संरक्षणापुरती मर्यादित राहणार नाही, तर एकूण पाच सुरक्षा निकषांचा यात समावेश करण्यात आला आहे.
Bharat NCAP 2.0 मध्ये झालेले मुख्य बदल:
क्रॅश प्रोटेक्शन – ५५% वेटेज
वल्नरेबल रोड युजर प्रोटेक्शन – २०% वेटेज
सेफ ड्रायव्हिंग – १०% वेटेज
अपघात टाळणे – १०% वेटेज
पोस्ट-क्रॅश सेफ्टी – ५% वेटेज
अनिवार्य फीचर्स: कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि कर्टन एअरबॅग्ज असणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. नवीन प्रोटोकॉलनुसार, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग सह एकूण ५ क्रॅश टेस्ट समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
५-स्टार रेटिंग मानक
५-स्टार रेटिंग मिळवण्यासाठी आवश्यक असलेले गुण कालांतराने वाढवले जातील. २०२७-२९ दरम्यान ७० गुण आणि त्यानंतर २०२९-३१ या काळात ८० गुणांचे लक्ष्य ठेवले जाईल. तसेच, प्रत्येक ५ सुरक्षा स्तंभांमध्ये किमान गुण मिळवणे आवश्यक असेल. या नवीन नियमांमुळे कार उत्पादक कंपन्यांना आपल्या वाहनांच्या सुरक्षिततेची रचना अधिक मजबूत करावी लागणार आहे, ज्यामुळे रस्त्यांवरील सुरक्षितता वाढण्यास मदत होईल.