62KMPL मायलेज देते ही कार! फीचर्स देखील जबरदस्त, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 08:53 PM2023-10-03T20:53:02+5:302023-10-03T20:53:54+5:30

आज आम्ही आपल्यासाठी एका अशा कारची माहिती घेऊन आलो आहोत, जी तब्बल 62 किलोमीटरपर्यंत मायलेज देऊ शकते. पण, या कारची किंमत फारच जास्त आहे. या कारमध्ये प्लग-इन-हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

best mileage car bmw xm know about mileage Features and price | 62KMPL मायलेज देते ही कार! फीचर्स देखील जबरदस्त, जाणून घ्या किंमत

62KMPL मायलेज देते ही कार! फीचर्स देखील जबरदस्त, जाणून घ्या किंमत

googlenewsNext

जेव्हा आपण एखादी कार खरेदी करतो, तेव्हा आपल्याला तिची किंमत दोन प्रकारे चुकवावी लागते. पहिली कार खरेदी करताना आणि दुसरी ती वापरण्यासाठी. जसे की, कार मेंटेनन्स आणि इंधनावर होणारा खर्च आदी.. मात्र आज आम्ही आपल्यासाठी एका अशा कारची माहिती घेऊन आलो आहोत, जी तब्बल 62 किलोमीटरपर्यंत मायलेज देऊ शकते. पण, या कारची किंमत फारच जास्त आहे. या कारमध्ये प्लग-इन-हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ही कार एवढे मायलेज देते. या कारचे नाव आहे बीएमडब्ल्यू एक्सएम (BMW XM).

किंमत आणि फीचर्स -
बीएमडब्ल्यू एक्सएमची किंमत 2.60 कोटी रुपये (एक्स-शोरूम) एवढी आहे. या कारला 4.4-लिटर ट्विन-टर्बो V8 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. याशिवाय, या कारमध्ये प्लग-इन-हायब्रिड टेक्नॉलॉजीचा वापरही करण्यात आला आहे. हा सेटअप 653 पीएस/800 एनएम जनरेट करतो. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनही देण्यात आले आहे. 

मायलेज -
या कारचे मायलेज ऐकूण कदाचित आपल्यालाही विश्वास बसणार नाही. ही कार 61.9 किमी/लिटरपर्यंतमायलेज देऊ शकते, असा दावा कंपनी करते. या कारमध्ये 69-लिटर फ्यूल टँक आहे. सिंगल फुल टँकमध्ये ही कार जवळपास 4271 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेन्ज देऊ शकते. 

असे आहेत फीचर्स -
या कारमध्ये 14.9-इंचाचे कर्व्ड टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, 12.3-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, हेडअप डिस्प्ले, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल, बोवर्स अँड विल्किन, 1500-वॅट डायमंड साउंड सिस्टिम, अॅम्बिअंट लायटिंग, 360-डिग्री कॅमेरा, सहा एअरबॅग्स, एबीएससह ईबीडी, टीपीएमएस आणि डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल सारखे फीचर्स आहेत. या कारमध्ये एडीएएस देखील आहे. ज्यात फ्रंट कॉलिजन वॉर्निंग, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सारखे अनेक फीचर्स आहेत.
 

Web Title: best mileage car bmw xm know about mileage Features and price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.