Helmets new rule: सावधान! केंद्राकडून हेल्मेटबाबत नवे नियम लागू; 5 लाखांचा दंड, 1 वर्षाची कैद...जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 04:17 PM2021-06-07T16:17:48+5:302021-06-07T16:21:56+5:30

Non-ISI helmet sale banned in India from June 1: रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आणि अपघात कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम न पाळणाऱ्यांना पाच लाखांचा दंड आणि १ वर्षांचा कारावास देखील भोगावा लागणार आहे.

Be careful! New rules on helmets from the Morth; 5 lakh fine, 1 year imprisonment | Helmets new rule: सावधान! केंद्राकडून हेल्मेटबाबत नवे नियम लागू; 5 लाखांचा दंड, 1 वर्षाची कैद...जाणून घ्या...

Helmets new rule: सावधान! केंद्राकडून हेल्मेटबाबत नवे नियम लागू; 5 लाखांचा दंड, 1 वर्षाची कैद...जाणून घ्या...

googlenewsNext

देशभरात करोडो हेल्मेट (helmets) ही दुय्यम दर्जाची किंवा बनावट आहेत. या बनावट हेल्मेटच्या वापरावर 1 जून 2021 पासून बंदी घालण्यात आली आहे. जर हे बेकायदेशीर म्हणजेच ISI (आयएसआय) मार्क असलेले हेम्लेट विकत असेल किंवा घेत असेल तर त्या दोघांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. (Enforce no sale & use of non-ISI helmets to check road deaths: Experts urge govt agencies)

हेल्मेट खरेदीवेळी या गोष्टी नक्की पहा; दंड तर वाचेलच पण...


यामुळे तुम्ही जेथून हेल्मेट खरेदी करणार असाल तिथे नीट पाहणी आणि खरेदी केल्यांनंतर पुन्हा तपासणी करणे गरजेचे आहे. तुम्ही जे हेल्मेट खरेदी करत आहात, ते सर्व आयएसआय मानके पूर्ण करते का? तसे सर्टिफिकेट आहे का हे पाहणे गरजेचे आहे. याचाच अर्थ 1 जूनपासून सर्व दुचाकीस्वारांना आयएसआय मार्क हेल्मेट असणे बंधनकारक झाले आहे. हे हेल्मेट BIS (ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) सर्टिफाइड असणे गरजेचे आहे. 


काय आहे नियम
रस्ते परिवाहन आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) 26 नोव्हेंबर 2020 मध्ये एक अधिसुचना काढली होती. या दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट गुणवत्ता आदेश, 2020 मध्ये ही हेल्मेट बीआयएस प्रमाणित असायला हवी, असे म्हटले होते. या हेल्मेटवर आयएसआयचे चिन्ह असायला हवे. 

हेल्मेट नसल्यास लायसन सस्पेंड होणार, 1000 चा दंड; कर्नाटकमध्ये केंद्राचा नियम लागू

 

रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आणि अपघात कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम न पाळणाऱ्यांना पाच लाखांचा दंड आणि १ वर्षांचा कारावास देखील भोगावा लागणार आहे. जो कोणी आयएसआय सर्टिफाईड नसलेले हेल्मेटचे उत्पादन करेल, विक्री करेल त्याला एक वर्षाची शिक्षा किंवा कमीतकमी एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. हा दंड 5 लाखांपर्यंत केला जाऊ शकतो. असे हेल्मेट वापरणाऱ्यांवरदेखील वाहतूक पोलीस कारवाई करू शकतात. आधीपासून दंडाचीही तरतूद आहे. 
 

Web Title: Be careful! New rules on helmets from the Morth; 5 lakh fine, 1 year imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.