शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

फक्त कारच नाही तर बाईकही CNG वर चालणार, बजाज लवकरच लाँच करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 11:32 IST

Bajaj CNG Bike : बजाज आपल्या सर्व सीएनजी बाईक एकाच प्लॅटफॉर्मवर तयार करणार आहे.

नवी दिल्ली : बजाज ऑटोने अलीकडेच 'बजाज ब्रुझर' नंतर 'बजाज फायटर' नावाची प्लेट ट्रेडमार्क केली आहे. दरम्यान, आगामी बजाज सीएनजी बाईक आणि नवीन अॅडव्हेंचर बाईकसाठी कोणते नाव वापरले जाईल, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. दुचाकी बनवणाऱ्या बजाज कंपनीने ५ ते ६ सीएनजी बाईक (दरवर्षी एक उत्पादन) लाँच करण्याच्या योजनेची पुष्टी केली आहे. 

बजाज आपल्या सर्व सीएनजी बाईक एकाच प्लॅटफॉर्मवर तयार करणार आहे. बजाजची पहिली सीएनजी बाईक १८ जून २०२४ ला लाँच केली जाऊ शकते. बजाज सीएनजी बाईक (ब्रुझर किंवा फायटर), जी अनेकदा टेस्टिंगदरम्यान पाहण्यात आली आहे. या बाईकला ११०cc-१२५cc इंजिनसह सीएनजी किट मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी एक छोटी पेट्रोल टाकीही देण्यात येणार आहे. 

या बाईकच्या बॉडीबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये टेलिस्कोपिक फोर्क आणि मोनोशॉक रिअर साइडमध्ये दिले जाईल. याचबरोबर, बाईकमध्ये स्टॉपिंग पॉवर फ्रंट डिस्क आणि रिअर ड्रम ब्रेकसह येईल. सीएनजी बाईक १७-इंचाच्या फ्रंट आणि रिअर व्हिलसह असेंबल केली जाऊ शकते. दरम्यान, लीक झालेल्या फोटोवरून असे दिसून आले आहे की. 

नवीन बजाज फायटर किंवा ब्रुझरमध्ये बॉक्सी बॉडी असेल, ज्यामध्ये गोल हेडलॅम्प, ब्रेस्ड हँडलबार आणि एक लांब सिंगल-पीस सीट असणार आहे. सीटच्या अगदी खाली सीएनजी किट बसवले जाईल. मार्केटमध्ये बजाजच्या या बाईकसोबत इतर कोणत्याही बाईकची थेट स्पर्धा नसणार आहे. मात्र, ही बाईक TVS Radeon, Hero Splendor Plus आणि Honda Shine १०० बाईकच्या सेगमेंटमध्ये असणार आहे. बजाजच्या पहिल्या सीएनजी बाईकची किंमत ८०,००० रुपये असू शकते. 

नवीन बजाज सीएनजी बाईकमध्ये नवीन टेक्नॉलॉजी असेल आणि बाजारात सध्या असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरइतकी स्वस्त नसेल, असे बजाज कॅपिटल लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सांगितले होते. दरम्यान, आगामी बजाज सीएनजी बाईकबद्दल अधिक माहिती येत्या काही काळात आणखी समोर येईल.

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलbikeबाईकAutomobileवाहन