बजाजची Urbanite चेतक इलेक्ट्रिक स्कूटर आहे खास, जाणून घ्या किंमत अन् वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 19:16 IST2019-10-16T19:11:51+5:302019-10-16T19:16:00+5:30

बजाज ऑटोनं नवी आयकॉनिक चेतक ही इलेक्ट्रिक स्कूटर एका प्रदर्शनात ठेवली आहे.

bajaj urbanite chetak unveiled in india know specifications | बजाजची Urbanite चेतक इलेक्ट्रिक स्कूटर आहे खास, जाणून घ्या किंमत अन् वैशिष्ट्ये

बजाजची Urbanite चेतक इलेक्ट्रिक स्कूटर आहे खास, जाणून घ्या किंमत अन् वैशिष्ट्ये

नवी दिल्लीः बजाज ऑटोनं नवी आयकॉनिक चेतक ही इलेक्ट्रिक स्कूटर एका प्रदर्शनात ठेवली आहे. बजाजनं नवी दिल्ली आयोजित एका कार्यक्रमात या स्कूटरची झलक दाखवली. चेतक ही बजाजची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. बजाज चेतकची इलेक्ट्रिक स्कूटर जानेवारी 2020मध्ये लाँच होणार असून, त्यावेळीच कंपनी या स्कूटरची किंमत निश्चित करणार आहे. भारतीय बाजारात बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटरचा Ather 450 आणि Okinawa Praise यांच्याशी थेट मुकाबला आहे.  

बजाजची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर इको मोडवर 95 किलोमीटरपर्यंत जाणार आहे. तसेच स्पोर्ट मोडवर स्कूटर 85 किलोमीटरपर्यंत धावणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये प्रीमियम फीचर्सही देण्यात आले आहेत. बजाज चेतकची इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णतः डिजिटल यंत्रणेनं सुसज्ज आहे. तसेच या स्कूटरला मोटारसायकलसारखी फॉब लाइटही दिली आहे. या स्कूटरमध्ये की-लेस इग्निशन बसवण्यात आलं असून, ते ऍपच्या माध्यमातून जोडण्यात आलं आहे. स्कूटरच्या फ्रंट हेडलॅप्सच्या जवळ एक ओव्हल LED स्ट्रिप देण्यात आली आहे. तसेच या स्कूटरमध्ये सहा रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.


या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांतसुद्धा सहभागी झाले होते. बजाजच्या या इलेक्ट्रिक स्कूटरचं प्रॉडक्शन कंपनीनं चाकणच्या कारखान्यात केलं आहे. चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फिक्स्ड केलेली बॅटरी देण्यात आली आहे. तसेच बजाजच्या चेतकमध्ये Li-Ion बॅटरी देण्यात आली असून,  5-15 ampच्या चार्जरनं ती चार्ज करता येणार आहे. तर इतर जण चार्जिंग स्टेशनवरूनही ती बॅटरी चार्ज करू शकतात. 

Web Title: bajaj urbanite chetak unveiled in india know specifications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.