फक्त 1000 रुपयांत बुक करा Bajajची 'ही' बाइक, पुढील आठवड्यापासून डिलिव्हरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 15:25 IST2021-11-06T15:25:11+5:302021-11-06T15:25:47+5:30
Bajaj Pulsar F250 & N250 : नवीन बजाज पल्सर 250 चे (Pulsar 250) ऑनलाइन बुकिंग अजून सुरू व्हायचे आहे. मात्र कंपनीच्या डीलरशिप स्टोअरमध्ये बाइकचे बुकिंग सुरू झाले आहे.

फक्त 1000 रुपयांत बुक करा Bajajची 'ही' बाइक, पुढील आठवड्यापासून डिलिव्हरी
नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात बजाज ऑटोने (Bajaj Auto) आपल्या लोकप्रिय मोटरसायकल पल्सरचे (Pulsar) दोन व्हेरिएंट Pulsar N250 आणि Pulsar F250 लॉन्च केले आहेत. Pulsar ब्रँड अंतर्गत कंपनीची ही सर्वाधिक इंजिन क्षमतेची बाइक आहे.
125cc ते 250cc पर्यंतच्या बाइक्स Pulsar ब्रँड अंतर्गत येतात.
नवीन बजाज पल्सर 250 चे (Pulsar 250) ऑनलाइन बुकिंग अजून सुरू व्हायचे आहे. मात्र कंपनीच्या डीलरशिप स्टोअरमध्ये बाइकचे बुकिंग सुरू झाले आहे. यासाठी ग्राहकांना 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत टोकन रक्कम भरावी लागेल.
Pulsar 250 ची टेस्ट ड्राइव्ह
जर तुम्हाला कंपनीच्या Pulsar 250 च्या दोन व्हेरिएंटपैकी कोणत्याही व्हेरिएंटची टेस्ट ड्राइव्ह घ्यायची असेल, तर डिलिव्हरी सुरू होताच ग्राहकांना त्याचा आनंद घेता येईल. कंपनी पुढील आठवड्यापासून Pulsar 250 च्या दोन्ही व्हेरिएंटची डिलिव्हरी सुरू करू शकते.
Pulsar 250 ची डिलिव्हरी
बजाज ऑटोने 10 नोव्हेंबरपासून नवीन पल्सर 250 च्या दोन्ही प्रकारांची डिलिव्हरी सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या पल्सर मॉडेलची डिलिव्हरी 20 वर्षांपूर्वी याच दिवशी सुरू झाली.
नवीन Pulsar 250 ची खासियत
Bajaj Auto ने आपल्या नवीन Bajaj Pulsar 250 चे दोन्ही मॉडेल पूर्णपणे रि-डिझाइन केले आहे. स्पोर्ट बाइक सेगमेंटमध्ये मजबूत उपस्थिती असलेली ही बाइक कंपनीने नवीन ट्यूबलर फ्रेम चेसिसवर विकसित केली आहे. याला समोरील बाजूस टेलिस्कोपिक सस्पेंशन देण्यात आले आहे. मागील बाजूस, कंपनीने नवीन मोनोशॉक सस्पेंशन युनिट दिले आहे.
ऑइल कूल्ड DTS-i इंजिन
Bajaj Pulsar 250 मध्ये कंपनीने DTS-i 4 स्ट्रोक ऑइल कूल्ड इंजिन दिले आहे. ते BS-6 अनुरूप आहे. हे 24.5 PS ची कमाल पॉवर आणि 21.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या बाइकमध्ये कंपनीने 5-स्पीड ट्रान्समिशन मोड दिला आहे आणि सेमी-डिजिटल मीटर दिले आहे आणि सोबत टॅकोमीटर नीडल देखील ठेवली आहे.
नवीन Bajaj Pulsar 250 ची किंमत
कंपनीने नवीन Bajaj Pulsar 250 बाइक 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सेगमेंटमध्ये ठेवली आहे. Bajaj Pulsar N250 मॉडेलची दिल्लीत एक्स-शोरूम किंमत 1,38,000 रुपये आणि बजाज Bajaj Pulsar F250 साठी 1.40,000 रुपये असेल.