Bajaj Pulsar सीरिजची विशेष Dagger एडिशन झाली लाँच; जबरदस्त लूक, डिझाईनसह मिळतात 'हे' फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 05:16 PM2021-04-27T17:16:24+5:302021-04-27T17:21:06+5:30

Bajaj Pulsar : पाहा किती आहे किंमत आणि काय आहेत फीचर्स

bajaj pulsar 150 to pulsar 180 and pulsar 220f new dagger edge edition launched price and features | Bajaj Pulsar सीरिजची विशेष Dagger एडिशन झाली लाँच; जबरदस्त लूक, डिझाईनसह मिळतात 'हे' फीचर्स

Bajaj Pulsar सीरिजची विशेष Dagger एडिशन झाली लाँच; जबरदस्त लूक, डिझाईनसह मिळतात 'हे' फीचर्स

googlenewsNext
ठळक मुद्देबाईकमध्ये देण्यात आलेत जबरदस्त ग्राफीक्सकाही दिवसांपूर्वी कंपनीनं लाँच केलं होतं आणखी एक व्हेरिअंट

भारतातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी बजाज ऑटो देशांतर्गत बाजारात आपल्या लोकप्रिय बाईक Bajaj Pulsar च्या रेंजचा विस्तार करताना दिसत आहे. नुकतीच कंपनीनं देशांतर्गत बाजारात Bjaja Pulsar NX ही बाईक लाँच केली होती. आता कंपनीनं आपली Dagger ही बाईक लाँच केली आहे. ही स्पेशल एडिशन Pulsar 150, Pulsar 180 आणि Pulsar 220F मध्ये सादर करण्यात आली आहे. 

Dagger मध्ये कंपनीनं केवळ ग्राफिक्स आणि पेंट स्किममध्ये बदल केले आहेत. याशिवाय मेकॅनिज्म यापूर्वीप्रमाणेच असेल. Bajaj Pulsar Dagger एडिशन कंपनीनं दोन पेंट स्किममध्ये लाँच केली आहे. यामध्ये पर्ल व्हाईट आणि सफायर ब्लू यांचा समावेश आहे. पर्ल व्हाईट कलरच्या बाईकमध्ये मडगार्ड आणि रिम्सवर रेड कलर हायलाईट देण्यात आले आहेत. ज्यामुळे या बाईकला स्पोर्टी लूक मिळतो. याशिवाय बॉडी पॅनल्सवर रेड आणि ब्लॅक कलरचे ग्राफिक्स देण्यात आले आहे. 

सफायर ब्लू कलरच्या बाईकवर मडगार्ज आणि रिम्सवर व्हाईट रंगाचे हायलाईट देण्यात आले आहे याशिवाय बॉडी पॅनलवर ब्लॅक व्हाईट ग्राफिक्स देण्यात आले आहेत. या बाईकमध्ये पूर्वीप्रमाणेच 149.5cc क्षमतेचे फोर स्ट्रोक इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 13.8 bhp ची पॉवर आणि 13.5Nm चा टॉर्क जनरेट करतं. सिंगल डिस्क व्हेरिअंटची किंमत 1,01,818 रूपये आणि डबल डिस्क व्हेरिअंटची किंमत 1,04,819 रूपये इतकी आहे.

Pulsar 180, Pulsar 220F ची किंमत

Pulsar 180 मध्ये कंपनीनं सफायर ब्लूच्या ऐवजी व्होल्कॅनिक रेड आणि स्पार्कल ब्लू मॅट रंगांचा पर्याय दिला आहे. यामध्ये कंपनीनं 178.6cc क्षमतेचं इंजिन दिलं आहे. ते 16.8bjp पॉवर आणि 14.52Nm चा टॉर्क जनरेट करतं. याची किंमत 1,09,651 इतकी निश्चित करण्यात आली आहे. Pulsar 220F मध्ये कंपनीनं अन्य व्हेरिअंटप्रमाणेच हायलाईट्स आणि ग्राफिक्स दिले आहे. यात 220cc क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे, जे 20.1 bhp ची पॉवर आणि 18.55Nm चा टॉर्क जनरेट करतं. या बाईकची किंमत 1,28,520 इतकी निश्चित करण्यात आली आहे. 

Web Title: bajaj pulsar 150 to pulsar 180 and pulsar 220f new dagger edge edition launched price and features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.