शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
4
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
5
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
6
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
7
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
8
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
9
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
10
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
11
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
12
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
14
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
15
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
16
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
17
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
18
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
19
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
20
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत

बजाजची 2024 Pulsar NS125 बाईक लाँच, अनेक बदल अन् आधीपेक्षा झाली महाग!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 5:57 PM

Bajaj Launches 2024 Pulsar NS125: बाजारात या बाईकची थेट स्पर्धा Hero Xtreme 125R आणि TVS Raider 125 होणार आहे.

Bajaj Launches 2024 Pulsar NS125: नवी दिल्ली : नवीन  Pulsar NS160 आणि NS200 लाँच केल्यानंतर आता बजाजने आता अपडेटेड Pulsar NS125 देखील भारतात लाँच केली आहे. नवीन 2024 Bajaj Pulsar NS125 ची किंमत 1,04,922 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. या किमतीमुळे आता जुन्या मॉडेलच्या तुलनेत 5,000 रुपयांनी महाग झाली आहे. बाजारात या बाईकची थेट स्पर्धा Hero Xtreme 125R आणि TVS Raider 125 होणार आहे.

2024 Bajaj Pulsar NS125 ला देखील मोठ्या पल्सर (NS160 आणि NS200) प्रमाणेच अपडेट मिळतात. बाईकची मस्क्युलर डिझाइन पूर्वीसारखीच ठेवण्यात आली आहे. बाईकच्या फ्रंट डिझाईन, फ्यूल टँक आणि साइड पॅनलमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, बाईकच्या हेडलाइट्समध्ये काही अंतर्गत बदल करण्यात आले आहेत. यात थंडर-शेप्ड एलईडी डीआरएल देण्यात आले आहेत.

बाईकमध्ये आता स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आले आहे, ज्याद्वारे रायडर एसएमएस आणि कॉल नोटिफिकेशन्स, फोनची बॅटरी लेव्हल यासारखी माहिती पाहू शकतो. याशिवाय, बाईकमध्ये यूएसबी पोर्ट आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) देखील देण्यात आले आहे. यूएसबी पोर्टद्वारे तुम्ही तुमचा फोन किंवा इअरफोन्स इत्यादी चार्ज करू शकता आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीमद्वारे सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे.

याचबरोबर, बाईकमध्ये सिंगल-चॅनल एबीएस सिस्टमसह फ्रंट डिस्क आणि रिअर ड्रम ब्रेक आहेत. यामध्ये 17 इंची अलॉय व्हील्स आहेत. 2024 Pulsar NS125 मध्ये पूर्वीसारखेच 125cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. तसेच, बाईकचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हे इंजिन 11.8bhp पॉवर आणि 11Nm टॉर्क जनरेट करते. सस्पेंशनसाठी, बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक आहेत.

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलbikeबाईकAutomobileवाहन