शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

पुन्हा सुरू झालं Bajaj Chetak च्या Electric Scooter चं बुकिंग; पाहा कशी कराल बूक स्कूटर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 6:01 PM

देशातील आघाडीची दुचाकी वाहन निर्माता Bajaj Auto नं गेल्या वर्षी बाजारात आपली एकमेव इलेक्ट्रीक स्कूटर चेतक सादर केली होती.

ठळक मुद्दे ही स्कूटर स्पोर्ट्स आणि ईको या दोन मोडमध्ये येते. क्विक चार्जिंग सिस्टममध्ये १ तासात स्कूटर २५ टक्के चार्ज होते. 

देशातील आघाडीची दुचाकी वाहन निर्माता Bajaj Auto नं गेल्या वर्षी बाजारात आपली एकमेव इलेक्ट्रीक स्कूटर चेतक सादर केली होती. सुरुवातीला या स्कूटरला बरीच लोकप्रियता मिळाली पण नंतर कंपनीने त्याचं बुकिंग थांबवलं होतं. पण पुन्हा एकदा कंपनीने या स्कूटरचं बुकिंग सुरू केलं आहे. या स्कूटरची त्याची किंमत १.१५ लाख रुपये (एक्स-शोरूम, बंगळुरू) इतकी आहे.आता ग्राहक ही स्कूटर कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि डीलरशिपद्वारे बुक करू शकतात. सध्या ही स्कूटर पुणे आणि बंगळुरू या दोनच शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. लवकरच या स्कूटरची विक्री देशातील अन्य २४ शहरांमध्येही सुरू केली जाईल, अशी कंपनीची योजना आहे. बाजारात ही स्कूटर प्रामुख्याने TVS iQube आणि Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करते.कशी आहे Bajaj Chetak बजाजच्या चेतक स्कूटरने साधारण 20 वर्षांपूर्वी भारतीयांच्या मनात गारुड केले होते. एका बाजुला असलेले इंजिन, खाली करून पेट्रोल त्या इंजिनात उतरले की कीक स्टार्ट मारायाची स्टाईल आणि तिच्यावरून नेण्यात येणारे साहित्य आदीसाठी ही चेतक प्रसिद्ध होती. बजाजने हीच थीम पुन्हा नव्या रुपात आणली आहे. कंपनीनं या स्कूटरमध्ये 3kWh क्षमतेच्या  IP67 रेटेड लिथियम आयन बॅटरी पॅकचा वापर केला आहे. याणध्ये देण्यात आलेली इलेक्ट्रीक मोटर 4kW ची पॉवर आमि 16Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर स्पोर्ट्स आणि ईको या दोन मोडमध्ये येते.

ड्रायव्हिंग रेंजस्कूटर इको मोडमध्ये ९५ किमी पर्यंत जास्तीत जास्त ड्रायव्हिंग रेंज देते, तर स्पोर्ट मोडमध्ये ८५ किमी पर्यंत चालविली जाऊ शकते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. दरम्यान ही रेंज ड्रायव्हिंग करण्याची पद्धत आणि रोड्सच्या कंडिशनवर अवलंबून आहे. या स्कूटरची पूर्ण बॅटरी चार्ज होण्यासाठी जवळपास ५ तासांचा वेळ लागतो आणि क्विक चार्जिंग सिस्टममध्ये १ तासात स्कूटर २५ टक्के चार्ज होते.  

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेडbajaj automobileबजाज ऑटोमोबाइल