शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
2
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
3
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी
5
पत्नी, सासरे ते कर्मचारी... रोहित पवारांनी MCA मध्ये पेरले हक्काचे मतदार; केदार जाधवचा गंभीर आरोप
6
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
7
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
8
शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार
9
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
10
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
11
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
12
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
13
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
14
देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; २०२६ जूनपर्यंत…
15
आजचे राशीभविष्य : बुधवार ७ जानेवारी २०२६; आजचा दिवस शुभ फलदायी, विविध स्तरांवर लाभ संभवतात
16
जि.प. निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात? १२ जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात
17
मुंबईची निवडणूक ठरविणार ‘ठाकरे ब्रँड’चे भवितव्य; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान अन् कसोटी
18
प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली
19
“विलासराव देशमुख यांच्या आठवणी कोणीही पुसू शकत नाही”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
सभेसाठी मैदान दिले जात नाही: संजय राऊतांचा दावा; ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर एकच मोठी सभा
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोमोबाइल क्षेत्राला मंदीचा फटका; आतापर्यंत 15 हजार जणांनी नोकऱ्या गमावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 21:12 IST

गेल्याच आठवड्यात भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचे वृत्त आल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात आर्थिक मंदीचे ढगही दाटू लागले आहेत.

नवी दिल्ली/मुंबई : गेल्याच आठवड्यात भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचे वृत्त आल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात आर्थिक मंदीचे ढगही दाटू लागले आहेत. गेल्या 19 वर्षांत पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रात अशा प्रकारची मंदी आहे. या मंदीमुळे दोन ते तीन महिन्यांत जवळपास 15 हजार जणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. ऑटो इंडस्ट्रीनं प्रसिद्ध केलेल्या 'SIAM'च्या अहवालातून ही बाब उघड झाली आहे.ऑटोमोबाईल क्षेत्र 3.7 कोटी जणांना रोजगार उपलब्ध करून देते. ऑटोमोबाइल क्षेत्रातील ही मंदी संपुष्टात न आल्यास आणखी काही जणांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची चिन्हे या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहेत. ऑटोमोबाइल क्षेत्रात जीएसटीचे दर 28 टक्के आहेत, ते दर तात्काळ 18 टक्क्यांवर आणायला हवेत, अशी मागणी ऑटो इंडस्ट्रीकडून करण्यात आली आहे. जुलै 2018 ते 2019 यादरम्यान आर्थिक क्षेत्रातल्या म्युच्युअल फंडांची गुंतवणूकही 64 हजार कोटींनी घटली आहे. वाहन क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे गेल्या आठवड्यात टाटा मोटर्सने उत्पादन थांबविल्याने खळबळ माजलेली असताना आता भारताची सर्वात मोठी कंपनी मारुतीनेही 1000 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामुळे या मंदीचा विळखा वाढू लागल्याचे संकेत मिळत आहेत.या अहवालात गाड्यांची एकूण विक्री, प्रवासी गाड्या, दुचाकींची विक्री यांचाही समावेश करण्यात आला आहे. 2018 मध्ये या गाड्यांची विक्री 22 लाख 45 हजार 224 एवढी झाली होती. परंतु तीच यंदा फक्त 18 लाख 25 हजार 148च्या नीचांकी पातळीवर आहे. 19 वर्षांनंतरची सर्वात मोठी मंदी आली असल्याचंही फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (फाडा)नं अहवालातून सांगितलं आहे. कर्मचाऱ्यांचे पगार उशिराने, शोरुमही बंद होऊ लागलेमारुती सुझुकीने नेक्सा आणि अरिना या ब्रँडखाली कार विक्री दालने उघडली होती. मध्यम वर्गाला आकर्षित करण्याचा हा प्रयत्न होता. बलेनो, इग्निस, सियाझ, एस क्रॉस अशा कार या दालनांमधून कंपनी विकत होती. मात्र, विक्री घटल्याने डीलरना ही दालने बंद करावी लागली आहेत. तुर्भेतील नेक्साचा शोरूम याच कारणामुळे बंद करण्यात आला आहे. तर मारुतीने सेकंड हँड कारच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले होते. ट्रू व्हॅल्यू या नावे त्यांनी वापरलेल्या कारची विक्री सुरु केली होती. मात्र, नवीन कारसोबत जुन्या कारची विक्रीही मंदावल्याने कर्मचाऱ्यांचे पगार काढणेही कंपनीला अवघड बनले होते. या कर्मचाऱ्यांचे पगार 20 दिवस उशिराने केले जात आहेत. 

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगcarकार