ऑटो इन्शुरन्स करणं 20 टक्क्यांपर्यंत महागणार?, नवीन व जुन्या वाहनधारकांना बसणार फटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 01:43 PM2022-01-14T13:43:19+5:302022-01-14T13:45:15+5:30

Auto insurance : थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स  (Third party motor insurance) 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याचा कंपन्यांचा मानस आहे.

Auto insurance rates are increasing in 2022 | ऑटो इन्शुरन्स करणं 20 टक्क्यांपर्यंत महागणार?, नवीन व जुन्या वाहनधारकांना बसणार फटका 

ऑटो इन्शुरन्स करणं 20 टक्क्यांपर्यंत महागणार?, नवीन व जुन्या वाहनधारकांना बसणार फटका 

Next

नवी दिल्ली : आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price)  दिवसेंदिवस वाढत आहेत. यातच आता देशातील करोडो वाहनधारकांना महागाईचा आणखी एक फटका बसू शकतो. विमा कंपन्यांनी यावर्षी विम्याचा हप्ता वाढवण्याची (insurance premium hike) पूर्ण तयारी केली आहे. थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स  (Third party motor insurance) 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याचा कंपन्यांचा मानस आहे.

विमा कंपन्यांनी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे (Insurance and Regulatory Development Authority of India) पाठवलेल्या प्रस्तावात कोरोनामुळे कंपन्यांचे होत असलेले नुकसान पाहता थर्ड पार्टी इन्शुरन्स 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याची मंजुरी देण्याची मागणी केली आहे. कंपन्यांची ही मागणी मान्य झाल्यास त्याचा थेट परिणाम देशातील करोडो वाहनधारकांवर होणार आहे.

Zeebiz च्या रिपोर्टनुसार, भारतात जवळपास 25 सामान्य विमा कंपन्या आहेत. त्यांच्या प्रस्तावाला IRDA मान्यता देईल, अशी कंपन्यांना आशा आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे की, कोरोनामुळे खूप नुकसान होत आहे. हे पाहता थर्ड पार्टी इन्शुरन्सचा सध्याचा प्रीमियम चांगला नाही आहे. कंपन्यांचे नुकसान होत आहे. काही कंपन्यांची परिस्थिती अशी झाली आहे की, त्यांची करदान क्षमता  (solvency) त्यांच्या विहित मर्यादेच्या खाली गेली आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्स क्मेम सुद्धा वाढले आहेत. त्यामुळे कंपन्यांवरील दबावही वाढला आहे.

थर्ड पार्टी विमा बंधनकारक 
2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानंतर, नवीन दुचाकी खरेदी करताना 5 वर्षांचा थर्ड पार्टी विमा आणि चारचाकी वाहनांसाठी 3 वर्षांचा थर्ड पार्टी विमा घेणे बंधनकारक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act), कोणतेही वाहन जे रस्त्यावरून फिरते, त्याचा थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. विमा प्रीमियम IRDAI कडून निर्धारित केला जातो. प्रीमियम दरवर्षी बदलतो. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे त्यात कोणताही बदल झालेला नाही.


 

Web Title: Auto insurance rates are increasing in 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन