शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Auto Expo 2023: ट्रॅफिक जॅम असिस्टसह नवी एमजी हेक्टर लाँच; सफारी, क्रेटा, ग्रँड विटाराला तोड मिळाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 11:26 AM

नवीन SUV ला संपूर्ण नवीन यूजर इंटरफेससह भारतातील सर्वात मोठी 35.56 सेमी (14-इंच) HD पोर्ट्रेट इंफोटेनमेंट सिस्टम मिळते.

ब्रिटीश कार कंपनी एमजी मोटर्सने ऑटो एक्सपो 2023 च्या पहिल्याच दिवशी हेक्टरचे फेसलिफ्ट लाँच केले आहे. भारताच्या या पहिल्या कनेक्टेड कारची किंमतही जाहीर केली आहे. नवीन जनरेशन सुरक्षितता आणि ड्रायव्हिंग अधिक सोईचे करण्यात आले आहे. नेक्स्ट-जनरल हेक्टर 5, 6 आणि 7-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये ऑफर केले जात आहे. यामध्ये प्रशस्त जागा, फिचर्स  देण्यात आले आहेत. एमजीने भारतभर ३०० डीलरशीप उघडली आहेत.

नवीन SUV ला संपूर्ण नवीन यूजर इंटरफेससह भारतातील सर्वात मोठी 35.56 सेमी (14-इंच) HD पोर्ट्रेट इंफोटेनमेंट सिस्टम मिळते. सेगमेंट-फर्स्ट डिजिटल ब्लूटूथ की आणि की-शेअरिंग क्षमतेमध्ये नवे शोध दिसतात. आपत्कालीन परिस्थितीत किंवा किल्ली हरवल्यास वाहन उघडणे, बंद करणे, सुरू करणे आणि चालवणे यासाठी डिजिटल की वापरली जाऊ शकते. रिमोट लॉक/अनलॉक वैशिष्ट्य वापरून कार कुठूनही अनलॉक केली जाऊ शकते.

अडास तर आहेच, पण इंटेलिजेंट ट्रॅफिक जॅम असिस्ट (TJA) लेनच्या मध्यभागी वाहन ठेवून आणि येणाऱ्या वाहनांपासून सुरक्षित अंतर राखून ट्रॅफिक जॅम परिस्थितीत अधिक सुरक्षा देते. हेक्टरमध्ये आता 75 हून अधिक कनेक्टेड फीचर्स उपलब्ध आहेत. यामध्ये 100 व्हॉइस कमांडचा समावेश आहे. 

सनरूफ साठी टच-स्क्रीन कंट्रोल, एंबियंट लाइट साठी व्हॉईस कमांड्स, 5 भारतीय भाषांमध्ये नेविगेशन वॉयस गाइडन्स, 50+ हिंग्लिश कमांड्स व अनेक अशी अॅप्स वापरता येणार आहेत. इन्फिनिटीची प्रिमियम ऑडिओ सिस्टीम वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह सक्षम आहे. ज्यामुळे एक इमर्सिव्ह सराउंड साउंड अनुभव मिळतो. नेक्स्ट-जेन हेक्टरमध्ये 6 एअरबॅग्ज, 360-डिग्री एचडी कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS), हिल असिस्ट कंट्रोल (HAC), सर्व चार-चाकी डिस्क ब्रेक, सर्व सीटसाठी 3-पॉइंट सीट आहेत. नव्या हेक्टरची किंमत 14.72 लाख रुपयांपासून सुरु होते. टॉप व्हेरिअंटची किंमत 22.42 लाख रुपयांपर्यंत जाते.

टॅग्स :auto expoऑटो एक्स्पो 2023MG Motersएमजी मोटर्स