Auto Expo 2020 : मारुती सझुकीची व्हिटारा ब्रेझा पहिल्यांदाच पेट्रोलमध्ये आली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 15:14 IST2020-02-06T15:13:41+5:302020-02-06T15:14:29+5:30
Auto Expo 2020 : नोएडातील ऑटो एक्स्पोमध्ये आज नव्या ब्रेझाचे अनावरण करण्यात आले.

Auto Expo 2020 : मारुती सझुकीची व्हिटारा ब्रेझा पहिल्यांदाच पेट्रोलमध्ये आली
देशातील आघाडीची कंपनी मारुती सुझुकीने सर्वाधिक खपाची कॉम्पॅक्ट एसयुव्ही ब्रेझा पहिल्यांदाच पेट्रोल इंजिनमध्ये लाँच केली आहे. नोएडातील ऑटो एक्स्पोमध्ये आज नव्या ब्रेझाचे अनावरण करण्यात आले.
नव्या ब्रेझाची लांबी 3995 mm, रुंदी 1790 mm, उंची 2500 mm आणि बूटस्पेस 328 लीटर आहे. तर फ्युअल टँक 48 लीटरचा देण्यात आला आहे. या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटीक ट्रान्समिशन हे पर्याय देण्यात आले आहेत. पुढे डिस्क ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. मागे कॉईल स्पिंग सोबत टॉर्शिअन बीम स्प्रिंग सस्पेन्शन देण्यात आले आहे. किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
Maruti Brezza मध्ये इंटीरिअर ट्रिम नव्याने देण्यात आले आहे. ऑल ब्लॅक केबिन देण्यात आली असून स्मार्टप्ले स्टुडिओ 7.0 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि अॅटोमॅटीक वायपर्स देण्यात आले आहेत.
ब्रेझामध्ये 1.5 लीटरचे बीएस ६ पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 105 hp ताकद आणि 138 Nm टॉर्क तयार करते.