शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
4
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
5
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
6
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
7
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
8
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
9
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
10
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
11
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
12
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
13
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
14
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
15
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
16
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
17
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
18
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
19
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
20
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
Daily Top 2Weekly Top 5

Audi A3 Cabriolet review: राजेशाही थाट, धावते सुस्साट, Audi A3ची काही औरच बात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 22:01 IST

भारतात कन्वर्टिबल कारची एक वेगळीच क्रेझ आहे. अशा कार रस्त्यावर चालवण्याची मज्जा काही औरच आहे. रस्त्यावरून कन्वर्टिबल कार जेव्हा धावते, त्यावेळी पाहणा-याचेही डोळे दिपून जातात.

-सुवासित दत्तनवी दिल्ली- भारतात कन्वर्टिबल कारची एक वेगळीच क्रेझ आहे. अशा कार रस्त्यावर चालवण्याची मज्जा काही औरच आहे. रस्त्यावरून कन्वर्टिबल कार जेव्हा धावते, त्यावेळी पाहणा-याचेही डोळे दिपून जातात. Audi A3 Cabriolet कार ग्राहकांच्या पसंतीस उतरू शकते काय, हे आम्ही तपासून पाहिलं आहे. A3 Cabrioletची कारची आवृत्ती नव्या रूपात कंपनीनं बाजारात उतरवली आहे. या कारची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.दोन दरवाजे असलेली ही लक्झरी कार ग्राहकांच्या मागण्या लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या कारमध्ये काही ठळक वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. त्यामुळेच अनेक ग्राहकांना ही कार पसंत पडत आहे. पुढील भागावर बसवलेल्या एलईडी हेडलॅम्प्स आणि ट्रेपोजिडल ग्रिलमुळे ही कार स्पोर्टी आणि आकर्षक दिसते. कारच्या समोरचा भाग हा ऑडी कारसारखाच भासतो.या कारमध्ये डायनॅमिक टर्न इंडिकेटर्ससह बंपरजवळ ग्रे लाइन दिल्यामुळे कारच्या सौंदर्यात भर पडली आहे. कारमध्ये बसवण्यात आलेले एलॉय व्हील (टायर) आकर्षक नसल्यानं ग्राहकांच्या फारसे पसंतीस पडलेले नाहीत. खरं तर ही कार A3 सेडान प्रकारातील आहे. कारमधील दोन दरवाजे आणि सॉफ्ट टॉप या कारला सेडान प्रकारापासून काहीसं वेगळं करतं.कारचं जास्त करून इंटिरियर A3 सेडान प्रकारातील आहे. कारमध्ये बसवलेले रिट्रॅक्टेबल इन्फोटेन्मेंट सिस्टीम इग्निशन गाडी सुरू करताच समोर येतात. या इन्फोटेन्मेंट सिस्टीममध्ये एमएमआय नेव्हिगेशन, रेडिओ, टेलिफोनसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कारमधलं डॅशबोर्ड आकर्षक असून, एसीचे ब्लोसुद्धा दिसायला फार सुंदर आहेत.कारमधल्या B&O स्पीकर्सचा आवाजही जबरदस्त आहे. स्पोर्ट्स कार असल्यामुळे यात 3 स्पोक मल्टी- फंक्शनल स्टिअरिंग व्हील देण्यात आली आहेत. मॅन्युअल गिअर बदलण्यासाठी तुम्हाला पॅडल शिफ्टर्सचा वापर करता येणार आहे. कारमध्ये दिलेल्या सीट्स Milano लेदरनं बनवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढच्या सीट्वर तुम्ही आरामात बसू शकता. तसेच या सीट्स तुम्हाला मॅन्युअली पुढे-मागेही करता येतात.कारमध्ये मागच्या सीट्सवर दोन प्रवासी आरामात बसू शकतात. परंतु लांबचा प्रवास असल्यास तिसऱ्या प्रवाशाला अगदीच आखडून बसावं लागू शकतं. पार्किंग सिस्टम आणि रिअर-फ्रंट कॅमे-यामुळे तुम्हाला ही कार कुठेही सहज पार्क करता येऊ शकते. तसेच चालकासाठी इन्फो डिस्प्ले दिल्यामुळे कारसंदर्भात सर्व माहिती चालकाला कार सुरू केल्यानंतर तात्काळ मिळते.कारमध्ये 320 लीटरचं बूट स्पेस देण्यात आल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त सामान कारमध्ये ठेवण्यास शक्य होणार आहे. तसेच या कारमध्ये पाच एअरबॅग्स देण्यात आल्या असून, ही कार ABS आणि EBDनं सुसज्ज आहे.50 किलोमीटर प्रतितासाच्या वेगात गाडी पळत असतानाही तुम्ही सॉफ्ट टॉप ओपन करून बाहेर पाहू शकता. या कारमध्ये बसवलेल्या इंजिनचा आकार काहीसा कमी केलेला आहे. या कारमध्ये मागच्या मॉडलमध्ये 1.8 लीटरचं इंजिन बसवण्यात आलं होतं. परंतु आता या नव्या अपग्रेडेड व्हर्जनमध्ये 1.4 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. या इंजिनची पॉवर 150पीएसहून अधिक आहे. तर त्यात 250 एनएमहून अधिक टॉर्क देण्यात आला आहे. खरं तर मागच्या मॉडलपेक्षा नव्या मॉडलमध्ये कारच्या पॉवरची क्षमता कमी करण्यात आलेली आहे. परंतु टॉर्कमध्ये कोणताही बदल केलेला नाही.पॉवरमध्ये कपात केल्यामुळे आता कारला वेग घेण्यासाठी 9.5 सेकंदांचा वेळ लागतो. पण A3 Cabriolet कारच्या मायलेजमध्ये प्रचंड सुधारणा झाल्याचं पाहायला मिळतं. कंपनीच्या दाव्यानुसार नव्या आवृत्तीतील कार आता प्रतिलिटरमागे 16.6 किलोमीटरऐवजी 19.2 किलोमीटर एवढं मायलेज देते. शहरी भागात ही कार पळवण्यास फारच मजा येते. फक्त कामगिरीतच नव्हे, तर लूक आणि स्टाइलमध्येही कार भारी आहे. कारचं स्टिअरिंग फीडबॅक आणि सस्पेन्शन सेटअप जबरदस्त आहे. Cylinder On Demand टेक्नोलॉजी आणि 7 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशननं ही कार सुसज्ज आहे.COD टेक्नोलॉजी कारचं मायलेज वाढवण्यास मदत करते. तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हॅसलफ्री आणि नाजूक आहे. या कारची दिल्ली एक्स शोरुमची किंमत 50.35 लाख रुपयांच्या घरात आहे. कारचं सौंदर्य खरंच लोकांना आकर्षून घेतं. कामगिरीच्या बाबतीही ही कार सामान्यांना निराश करत नाही. हायवेवर ही कार जबरदस्त धावत असल्यानं  तुम्ही स्पोर्टी कार घेण्याचा विचार करत असाल तर  Audi A3 Cabriolet चांगला पर्याय ठरू शकतो.

टॅग्स :Automobileवाहनcarकार