एथरने 450S स्कूटरची किंमत २५००० नी कमी केली; ओलाची काही खैर नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 17:08 IST2024-01-10T17:07:36+5:302024-01-10T17:08:11+5:30
किंमत कमी केल्याने एथर छोट्या छोट्या शहरांत पोहोचू शकेल असे कंपनीची रणनिती आहे.

एथरने 450S स्कूटरची किंमत २५००० नी कमी केली; ओलाची काही खैर नाही
ओला ईलेक्ट्रीकपूर्वी सर्वाधिक खपाची असलेली कंपनी एथर एनर्जीने आपल्या एन्ट्री लेव्हल इलेक्ट्रीक स्कूटर 450S च्या किंमतीमध्ये २५ हजार रुपयांची कपात केली आहे. यामुळे Ather 450S चा बेस व्हेरिअंटची किंमत 1.09 लाख रुपये (एक्स-शोरूम, बंगळुरु) झाली आहे. तर प्रो पॅक व्हेरिअंटची किंमत १.१९ लाख रुपये झाली आहे.
Ather 450S च्या बेस व्हेरिअंटमध्ये कंपनीने २०००० रुपयांची कपात केली आहे. तर प्रो पॅकमध्ये २५ हजार रुपयांची कपात केली आहे. इलेक्ट्रीक स्कूटर कंपनीचे लक्ष्य टू टिअर आणि थ्री टिअर बाजारात आक्रमक होण्याचे आहे. किंमत कमी केल्याने एथर छोट्या छोट्या शहरांत पोहोचू शकेल असे कंपनीची रणनिती आहे. या कंपनीची खरी टक्कर ओलाच्या कमी किंमतीतल्या स्कूटरसोबत आहे.
Ather 450S ही ब्रँडची सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. 2023 मध्ये लाँच केलेली, ई-स्कूटर ब्रँडच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या 450 प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे. या स्कूटरमध्ये 2.9 kWh चा लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरण्यात आले आहे. एका चार्जवर 115 किलोमीटरपर्यंतच्या रेंजचा दावा केला जातो.