शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

रात्री व दिवसा मागील वाहनाच्या प्रखर प्रकाशापासून बचाव करणारा अॅन्टी ग्लेअर आरसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:46 IST

कारमधील आतील बाजूला असलेल्या सेंट्रल मिररचा फायदा रात्री व्हायला हवा, ड्रायव्हरला मागील वाहनाच्या प्रकाशजोताच्या त्रास होता कामा नये. त्यासाठी अॅन्टी ग्लेअर आरसा हा एक चांगला उपाय आहे.

रात्रीच्यावेळी कार चालवताना मागून येणाऱ्या वाहनांचे प्रखर प्रकाशझोत कारमधील विंडशिल्डला मध्यभागी लावलेल्या आरशातून ड्रायव्हरच्या डोळ्यावर थेट येत असतात. अशा वेळी अनेकदा ड्रायव्हरचे लक्ष विचलीत होते, त्याला त्यामुळे समोरून येणारे वाहनही नीट दिसू शकत नाही. याचे कारण त्याचे डेळे मागील वाहनाच्या प्रकाशझोतामुळे दिपून जातात. सर्वसाधारण आरशांमधून हा परावर्तीत होणारा प्रकाश खूप त्रासदायक असतो. वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूला बाहेरून असणाऱ्या आरशातूनही अशा प्रकारच्या प्रकाश परावर्तनाचा त्रास ड्रायव्रना सहन करावा लागतो. आरशाचा कारसाठी वापर सुरू झाल्यानंतर विविध प्रकारचे संशोधनही त्या त्या अनुभवांनुसार केले गेले. त्यातून अॅन्टी ग्लेअर काचेचा शोध लागला व त्या अनुषंगाने आरसा तयार करण्यात आला . यात आज हातानेच अॅडजेस्ट केल्यानंतर तुम्हाला सेंट्रल मिरर म्हणजे कारमधील आतील बाजूस मध्यावर असणारा आरसा हा अशा प्रकारचा विकत मिळतो. काही उच्च श्रेणीमधील कारना तो कंपनीकडूनच पुरवला जातो. मात्र ज्या कारना तो नसतो,त्या कारच्या ड्रायव्हर्सना रात्रीच्यावेळी कार चालवताना मागून येत असलेल्या वाहनाच्या हेडलॅम्पचा प्रकाशझोत चुकवण्यासाठी नाना खटपटी कराव्या लागतात.अगदी क्षणाक्षणाला त्या आरशामुळे होणारा त्रास चुकवावा लागतो. यासाठी अँन्टी ग्लेअर आरसा बसवून घेता येतो. मॅन्युअल प्रमाणेच अन्य आपोआप अॅडजेस्ट होणारा व मागील लाईटला मंद करणारा आरसाही मिळतो. आधुनिक कार्समध्ये हा सेन्सर्सद्वारे मागील वाहनाचा प्रकाशझोत मंद करणारा आरसा काहीसा महाग असतो. तर हातानेच त्या आरशाला वर खाली करून त्याचा अॅन्टी ग्लेअरचा फायदा करून देणाराही साधा आरसा मिळतो. त्यामुळे मागील वाहनाच्या प्रकाशझोताचा त्रास तुमच्या डोळ्यांना होत नाही व त्यामुळे तुमचे डोळे त्यामुळे दिपून जात नाहीत. सकाळच्यावेळेत तोच आरसा पुन्हा वर करून सर्वसाधारण आरशांप्रमाणे वापरता येतो.नेहमीच्या आरशाच्या आकाराचाच हा आरसा मिळतो. तो थेट विंडशिल्डवर आतील बाजूने चिकटवून लावण्याचाही मिळतो, तसेच असलेल्या आरशावर वरच्या बाजूने अडकवण्याच्या पद्धतीचाही मिळतो. मात्र आधीच्या आरशाला वरच्या बाजूने अडकवण्याचा आरसा मूळ आरशाला जड होत असल्याने तो मूळ आरशाच्या हूकला व त्याच्या वळण्याच्या क्रियेसाठी असलेल्या बॉलला सैल करतो, कार चालवताना तो अॅडजेस्ट केला असला तरी तो खाली येतो व मागील काहीच दृश्य तुम्ही पाहू शकत नाही. त्याचे वजन हे मागील आरशावर पेललेले असल्याने तो वापरणे अधिक त्रासदायक ठरतो. त्यापेक्षा मूळ आरसा काढून अॅन्टीग्लेअर आरसा नव्याने बसवून घेणे कधीही चांगले असते. रात्रीच्यावेळी वाहन चालवताना मागून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश कमी करणारा हा मॅन्युएली ऑपरेटेड आरसाच मात्र स्वस्त व जास्त कटकटीचा नसल्याने रात्रीच्या वाहनचालनात खूप उपयुक्त ठरावा असा आहे.

टॅग्स :carकार