आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 14:47 IST2025-12-12T14:46:58+5:302025-12-12T14:47:07+5:30
Tata Sierra Mileage: टाटा मोटर्सची नवीन Sierra सध्या सर्वाधिक चर्चेत येणारी SUV ठरली आहे.

आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
Tata Sierra Mileage: टाटा मोटर्सची नवीन Sierra यावर्षीच्या सर्वाधिक चर्चित SUV पैकी एक ठरली आहे. मोठे बदल, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवी पॉवरट्रेनसह ही ननवीन Sierra लॉन्च झाली आहे. सर्वाधिक लक्ष वेधणारी बाब म्हणजे सिएरामधील 1.5-लीटर हायपेरियन इंजिन, ज्याने टेस्टिंगदरम्यान 29.9 kmpl इतकी प्रभावी फ्युएल एफिशिएन्सी नोंदवली आहे. या आकाराच्या आणि क्षमतेच्या SUV साठी हा आकडा आश्चर्यकारक असला तरी, हे मायलेज विशेष टेस्टिंग कंडिशन्समध्ये मिळाले आहे.
12 तासांच्या ट्रॅक टेस्टमध्ये मिळाला 29.9 kmpl चा आकडा
ही फ्युएल एफिशिएन्सी इंदूरमधील NATRAX टेस्ट ट्रॅक वर सलग 12 तासांच्या ड्राइव्हमध्ये मिळाली. टेस्ट सकाळी 7 वाजता सुरू होऊन सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालली. केवळ ड्रायव्हर बदलण्यासाठी छोटासा ब्रेक घेण्यात आला.
अशा ट्रॅक टेस्टमध्ये ट्रॅफिक नसते, गाडी सतत एका स्थिर वेगात धावते, म्हणून मायलेज प्रत्यक्ष रस्त्यांपेक्षा खूपच चांगले निघते. या टेस्टमध्ये सिएराने 222 kmph ची टॉप स्पीडही गाठली. ग्राहकांसाठी येणाऱ्या मॉडेलमध्ये टॉप स्पीड 190 kmph वर मर्यादित असेल.
खऱ्या रस्त्यांवर मायलेज किती मिळू शकेल?
टेस्टिंगमध्ये नोंदवलेला आकडा प्रत्यक्ष शहरातील रस्त्यांवर मिळणे अवघड आहे. रिअल-वर्ल्ड ड्रायव्हिंगमध्ये ट्रॅफिक, सततची ब्रेकिंग, रस्त्यांची स्थिती, एसीचा वापर आणि ड्रायव्हिंग स्टाईल...यांसारख्या गोष्टीमुळे मायलेज कमी-जास्त होण्याची शक्यता असते. तरीदेखील हा आकडा टाटाच्या नवीन इंधन कार्यक्षम तंत्रज्ञानातील प्रगती अधोरेखित करतो.
सिएराचे इंजिन पर्याय आणि तंत्रज्ञान
नवीन टाटा सिएरा तीन इंजिन पर्यायांसह बाजारात येत आहे:
1. 1.5-लीटर हायपेरियन T-GDi (नवीन इंजिन)
160 PS पॉवर
255 Nm टॉर्क
6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स
2. 1.5-लीटर रेवोट्रॉन इंजिन
106 PS पॉवर
7-स्पीड DCA ऑटोमॅटिक गिअरबॉक्स