Maruti Suzuki सह या वाहन कंपनीचाही ग्राहकांना धक्का, किंमत वाढीची केली घोषणा; केव्हापासून लागू होणार नवे दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 14:58 IST2024-12-06T14:57:33+5:302024-12-06T14:58:48+5:30

Maruti suzuki increased car prices : देशात सर्वाधिक वाहनांची विक्री करणाऱ्या मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

Along with Maruti Suzuki, this car company also shocked the customers, announced a price hike; When will the new rate be applicable | Maruti Suzuki सह या वाहन कंपनीचाही ग्राहकांना धक्का, किंमत वाढीची केली घोषणा; केव्हापासून लागू होणार नवे दर?

Maruti Suzuki सह या वाहन कंपनीचाही ग्राहकांना धक्का, किंमत वाढीची केली घोषणा; केव्हापासून लागू होणार नवे दर?

Maruti Suzuki price hikes : मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. देशात सर्वाधिक वाहनांची विक्री करणाऱ्या मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे या दिग्गज कंपनीच्या वाहनांच्या किंमतीत लवकरच वाढ होऊ शकते. 

खरे तर, मारुती सुझुकी ही वाहनांच्या किंमतीत वाढ करणारी दुसरी कंपनी ठरली आहे. यापूर्वी ह्युंदाई मोटर इंडियानेही आपल्या वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मारुतीने शुक्रवारी शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. मात्र कंपनीने, कोणत्या वाहनाची किंमत किती वाढणार हे सांगितलेले नाही. मात्र, या किंमती 4% पर्यंत वाढणे अपेक्षित असल्याचे नमूद केले आहे.

यामुळे वाढवण्यात आल्या किंमती -
मारुती सुझुकीने दिलेल्या माहितीनुसार, ”वाढता इनपुट खर्च आणि ऑपरेटिंग खर्च पाहता कंपनीने 2025 पासून आपल्या कारच्या किमती वाढवण्याचे ठरवले आहे. कंपनी नेहमीच खर्च कमी ठेवण्याचा आणि त्याचा ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करते. मात्र, वाढलेल्या किमतीचा काही भाग बाजारावर टाकणे आवश्यक असू शकते.”

Hyundai नेही केलीय भाव वाढीची घोषणा - 
मारुती सुझुकीशिवाय, ह्युंदाईनेही गुरुवारी आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. Hyundai Motor India (HMIL) ने 1 जानेवारी 2025 पासून आपल्या मॉडेल्सच्या रेंजमध्ये 25,000 रुपयांची वाढ केली जाईल. तसेच, कंपनीच्या म्हणण्यानुसार वाढता इनपुट खर्च आणि लॉजिस्टिक खर्चात वाढ झाल्याने किमती वाढवाव्या लागल्या आहेत, असे म्हटले आहे.
 

Web Title: Along with Maruti Suzuki, this car company also shocked the customers, announced a price hike; When will the new rate be applicable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.