बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 14:09 IST2025-12-17T14:09:06+5:302025-12-17T14:09:26+5:30
टाटाने भारतीय बाजारात गेल्या २५ नोव्हेंबरला आपली सिएरा SUV लाँच केली असून. तिची एक्स-शोरूम किंमत ₹११.४९ लाख ते ₹२१.४९ लाखांपर्यंत आहे...

बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
टाटा मोटर्सने या वर्षात सिएरा SUV च्या रुपाने आपली शेवटची खेळी खेळली आहे आणि टाटाची ही खेळी यशस्वी होतानाही दिसत आहे. यामुळे, टाटासाठी २०२५ हे वर्ष चांगल्या आठवणींसह संपुष्टात येणार आहे. खरे तर, कंपनीने 16 डिसेंबरपासून या कारच्या बुकिंगला सुरुवात केली आहे आणि पहिल्याच दिवशी या कारला 70,000 हून अधिक बुकिंग मिळाली आहे. कंपनीनेही याची पुष्टी केली आहे. शिवाय, अंदाजे १.३५ लाख संभाव्य ग्राहकांनी त्यांचे पसंतीचे कॉन्फिगरेशन सबमिट केले असून ते बुकिंगची औपचारिकता पूर्ण करण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत.
टाटाने भारतीय बाजारात गेल्या २५ नोव्हेंबरला आपली सिएरा SUV लाँच केली असून. तिची एक्स-शोरूम किंमत ₹११.४९ लाख ते ₹२१.४९ लाखांपर्यंत आहे. तसेच, बुकिंग टोकन रक्कम ₹२१,००० एवढी ठेवण्यात आली आहे. ही एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह अनेक व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. महत्वाचे म्हणजे, ही कार कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये टाटा कर्व्हच्या वर आहे.
असे आहेत सिएराचे इंजिन पर्याय आणि तंत्रज्ञान -
नवीन टाटा सिएरा तीन इंजिन पर्यायांसह बाजारात येत आहे...
- 1. 1.5-लीटर हायपेरियन T-GDi (नवीन इंजिन) - यात, 160 PS पॉवर, 255 Nm टॉर्क आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळेल.
2. 1.5-लीटर रेवोट्रॉन इंजिन - यात 106 PS पॉवर, 7-स्पीड DCA ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिलेल.
Tata Sierra च्या सर्व व्हेरिअंट्सची किंमत अशी -
- टाटा सिएरा स्मार्ट प्लस व्हेरिअंट : १.५-लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन (मॅन्युअल ट्रान्समिशन) सह असलेल्या बेस मॉडेलची किंमत ₹ ११.४९ लाख आहे. तर १.५-लीटर क्रायोजेट डिझेल इंजिन असलेल्या बेस मॉडेलची किंमत ₹ १२.९९ लाख आहे.
- प्योर आणि प्योर प्लस: टाटा सिएराच्या प्योर व्हेरिएंट्सची किंमत ₹ १२.९९ लाख ते ₹ १५.९९ लाख आहे, तर प्योर प्लस व्हेरिएंट्स ₹ १४.४९ लाख ते ₹ १७.४९ लाख रुपयांच्या दरम्यान आहेत.
- अॅडव्हेंचर आणि अॅडव्हेंचर प्लस : सिएरा च्या अॅडव्हेंचर मॉडलमध्ये तीन व्हेरिअँट लॉन्च करण्यात आले आहेत. अॅडव्हेंचर मॉडेल ₹ १५.२९ लाख ते ₹ १६.७९ लाख दरम्यान उपलब्ध आहे, तर अॅडव्हेंचर प्लसची किंमत ₹ १५.९९ लाख ते ₹ १८.४९ लाखपर्यंत जाते.
- टॉप मॉडेल अकम्प्लिश्ड आणि अकम्प्लिश्ड प्लस : सिएराच्या Accomplished मॉडलचे चार व्हेरिअँट आणि Accomplished Plus चे तीन व्हेरिअँट बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत. Accomplished व्हेरिएंट्सची किंमत ₹ १७.९९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉपचे Accomplished Plus मॉडेल ₹ २१.२९ लाखांपर्यंत पोहोचते.