Affordable Cars: 'या' आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार, किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू, मायलेज सुद्धा बेस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 19:13 IST2024-12-24T19:08:59+5:302024-12-24T19:13:29+5:30
Top Affordable Cars in Indian Market : अशा कारबद्दल माहिती जाणून घ्या, ज्यांची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

Affordable Cars: 'या' आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार, किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू, मायलेज सुद्धा बेस्ट!
Top Affordable Cars in Indian Market : परवडणाऱ्या किमतीत कार मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. भारतीय बाजारपेठेत तुमच्यासाठी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता? हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा कारबद्दल माहिती जाणून घ्या, ज्यांची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
Maruti Suzuki Alto K10
मारुती सुझुकी ऑल्टो K10 ही कार सर्वाधिक विक्री होणारी आहे. कंपनीच्या ऑल्टो K10 मध्ये 1-लिटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 67PS पॉवर आणि 89Nm टॉर्क निर्माण करू शकते. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा पर्यायी पाच-स्पीड AMT ट्रान्समिशनचा पर्याय आहे. यासोबतच ऑल्टो K10 ही सीएनजी व्हर्जनमध्येही मिळत आहे. यामध्ये आयडल-इंजिन स्टार्ट/स्टॉप टेक्नॉलॉजी देखील मिळत आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे.
Maruti Suzuki Celerio
स्वस्त कारमध्ये मारुती सुझुकी सेलेरियो एक उत्तम पर्याय आहे. सेलेरियोमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 67bhp ची कमाल पॉवर आणि 89nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. सेलेरियोची सुरुवातीची किंमत 5 लाख 36 हजार रुपये आहे. ही भारतीय बाजारपेठेत एकूण 4 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
Tata Tiago
टाटा टियागो ही कार तुमच्या बजेट सेगमेंटमध्ये उत्तम प्रकारे बसू शकते. टाटाच्या या कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 86bhp ची कमाल पॉवर आणि 113nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. टियागोमध्ये तुम्हाला CNG पॉवरट्रेनचा पर्याय देखील मिळतो. भारतीय बाजारात तुम्हाला टाटा टियागो 4 लाख 99 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळेल.
Maruti Suzuki S-Presso
तुमच्या बजेटमध्ये बसणारी चौथी कार म्हणजे मारुती सुझुकी एस-प्रेसो. ही कार कंपनीची परवडणारी कार आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 4.26 लाख रुपयांपासून सुरू होते. ऑल्टो K10 चे इंजिन एस-प्रेसोमध्ये उपलब्ध आहे. या कारचा बेस व्हेरिएंट 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. एस-प्रेसोमध्ये 1-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 68PS पॉवर आणि 90Nm टॉर्क निर्माण करते.