होंडा कंपनीनं आपली नवी कार बाजारात लॉन्च केली आहे. या कारचं नाव २०२३ होंडा एचआर-व्ही असं आहे. कंपनीनं नव्या कारमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिलं आहे. त्याचसोबत आकर्षक डिझाइन आणि कारचा आकार देखील मोठा असल्याचं दिसून येत आहे. कारमध्ये बसल्यावर अगदी प्रीमियम क्लासचा अनुभव येईल असा दावा कंपनीनं केला आहे. सध्या ही कार नॉर्थ अमेरिकेच्या बाजारात दाखल झाली आहे. अमेरिकेत लॉन्च झालेल्या कारचे फिचर्स युरोपमध्ये लॉन्च झालेल्या मॉडलपेक्षा खूप वेगळे आहेत. होंडा सिविकच्याच प्लॅटफॉर्मवर नव्या कारची निर्मिती करण्यात आली आहे.
नॉर्थ अमेरिकेत या कारची किंमत २३,६५० अमेरिकी डॉलर म्हणजेच १८.३८ लाख रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर कारचा टॉप मॉडल २२.५१ लाख रुपयांना उपलब्ध आहे. याआधीच्या मॉडलच्या तुलनेत २०२३ होंडा एचआर-व्ही कार आकारानं मोठी आहे. नवी एचआरव्ही २३९ एमएमनं मोठी आहे.
2023 Honda HR-V चे फिचर्सलेटेस्ट कारच्या डिझाइनवर चांगलं काम करण्यात आल्याचं दिसून येतं. बॉडी पॅनल्स, शार्प बॉडी हेडलॅम्पसोबतच डेटाइम रनिंग एलईडी लाइट्स आणि ब्लॅक इन्सर्टसोबत दमदार ग्रिल्स देण्यात आले आहेत. यासोबतच शार्क फिन अँटिना देखील देण्यात आला आहे.
2023 Honda HR-V चे अतिरिक्त फिचर्स2023 Honda HR-V च्या ग्राहकांना काही खास पर्यायी फिचर्स देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यासाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील. यात एडब्ल्यूडी सिस्टम देण्यात आलं आहे. ज्यासाठी १५०० अमेरिकी डॉलर खर्च करावे लागतील. त्यासोबतच ९ इंचाचा इन्फोटेंन्मेंट सिस्टम देखील देण्यात आला आहे. वायरलेस अॅपल कार प्ले आणि अँड्राइड ऑटो कनेक्टीव्हीटीसोबत कार उपलब्ध आहे.
2023 Honda HR-V कारचा परफॉरमन्स2023 Hondra HR-V च्या परफॉरमन्सबाबत बोलायचं झालं तर कारमध्ये २.० लीटर फोअर सिलिंडर नॅचरली अस्परेटेड इंजिन देण्यात आलं आहे. सिविक कारप्रमाणेच या कारमध्येही १६० पीएस पावर आणि १८७ एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकतात.