2018 दुकाटी मॉनस्टर 821: 1 तारखेला लॉन्च होणार ही बाईक, जाणून घ्या खासियत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 16:12 IST2018-04-27T16:12:19+5:302018-04-27T16:12:19+5:30
दुकाटी इंडिया 1 मे रोजी आपली नवीन बाईक 2018 मॉनस्टर 821 लॉन्च करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या बाईकची चांगलीच चर्चा रंगली आहे.

2018 दुकाटी मॉनस्टर 821: 1 तारखेला लॉन्च होणार ही बाईक, जाणून घ्या खासियत
नवी दिल्ली : दुकाटी इंडिया 1 मे रोजी आपली नवीन बाईक 2018 मॉनस्टर 821 लॉन्च करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या बाईकची चांगलीच चर्चा रंगली आहे. चला जाऊन घेऊया या बाईकची खासियत आणि किंमत...
दुकाटी इंडियाने या नव्या बाईकचा टीझर व्हिडीओ कंपनीच्या सोशल मीडियात शेअर केला आहे. या बाईकमध्ये 821 सीसी टेस्टास्ट्रेटा व्ही इंजिन देण्यात आलं आहे. या इंजिनची पॉवर 108 बीएचपी असेल. हे इंजिन 7750 आरपीएम वर 86 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं.
या बाईकच्या सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत काही आणखी अपडेट करण्यात आले आहेत. यात री-डिझाईन्ड फ्यूल टॅंक, नवीन हेडलॅम्प देण्यात आले आहेत. या बाईकचा मागचा भाग स्लिम ठेवण्यात आला आहे.
दुकाटी मॉनस्टर 821 बाईकची एक्स-शोरुम किंमत 10 लाख रुपये इतकी असू शकते अशी चर्चा आहे. भारतात या बाईकची स्पर्धा Triumph Street Triple S, Kawasaki Z90 आणि Suzuki GSX-S750 सोबत असणार आहे.