अबब! रेकॉर्ड ब्रेक किंमतीत विकली गेली फरारीची ही कार, किंमत वाचून व्हाल हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 13:39 IST2018-08-29T13:36:29+5:302018-08-29T13:39:01+5:30
आपल्या हवेसारख्या वेगासाठी आणि परफॉर्मंन्सच्या दृष्टीने जगभरात लोकप्रिय असलेली फरारीची एक कार रेकॉर्ड ब्रेक किंमतीत विकली गेली आहे.

अबब! रेकॉर्ड ब्रेक किंमतीत विकली गेली फरारीची ही कार, किंमत वाचून व्हाल हैराण!
नवी दिल्ली : आपल्या हवेसारख्या वेगासाठी आणि परफॉर्मंन्सच्या दृष्टीने जगभरात लोकप्रिय असलेली फरारीची एक कार रेकॉर्ड ब्रेक किंमतीत विकली गेली आहे. Ferrari 250 GTO नावाची ही कार कॅलिफोर्नियामध्ये एका कार लिलावात विकली गेली.
या कारने लिलावात सर्वात जास्त किंमत मिळवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. याआधी २०१४ मध्ये एका कार सर्वात महाग विकली गेली होती. आता ही कार ४ कोटी ८४ लाख ५ हजार डॉलर म्हणजेच जवळपास ३३८ कोटी रुपयात विकली गेली आहे.
Ferrari GTO च्या या कारला रेकॉर्ड ब्रेक किंमत मिळाली कारण ही कार फार साधी आणि गुड लूकिंग आहे. महत्त्वाचं म्हणजे ही कार फरारीच्या सर्वात यशस्वी रेसिंग कारपैकी एक आहे.
या कारने 1962 Italian GT चॅम्पियनशिप जिंकली आहे. त्यासोबतच या कारणे १९६२ आणि १९६५ दरम्यान १५ पेक्षा जास्त रेस जिंकल्या आहेत. ही कार चालवणाऱ्यांमध्ये फिल हीलची सामिल होता. जो फॉर्म्यूला वन रेसिंग चॅम्पियन होणारा पहिला अमेरिकन आहे.
(Image Credit : RM Sotheby's)
ही कार खरेदी करणारा माजी मुख्य सॉफ्टवेअर आर्किटेक्ट डॉ. ग्रेग व्हिटन आहे. हा व्यक्ती गेल्या १८ वर्षांपासून मायक्रोसॉफ्टमध्ये काम करत आहे. या व्यक्तीने मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सल आणि पॉवर पॉईंटची निर्मिती केली आहे.