मनसे वर्धापन दिनाचा मान नाशिकला देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून राज ठाकरे व युवा नेते अमित ठाकरे नाशकात तळ ठोकून आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमुळे मनसेच्या या मेळाव्याला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. ...
मंदिरात ठाकरे कुटुंबियांच्यावतीने गणपती पूजन, पुण्याहवाचन, अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणण्यात आली. त्यानंतर अमित व मिताली ठाकरे यांनी मंदिराला प्रदक्षिणा मारली. ...