सामान्यांवर नियतीने केलेल्या आघाताची फारशी चर्चा होत नसली तरी, अशाच सामान्यांचे प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या राजकारण्यांवर नियती कणभर का होईना अधिकच रूष्ट होत असते तर काहींची भरभरून परतफेड करते. ...
उमेदवारीसाठी पक्षावर दबाव आणून नंतर पदरात लाभाचे पद पाडून घेण्याचा अन्य राजकीय पक्षात वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा शिवसेनेत रूजू होण्यास करंजकर कारणीभूत ठरू नयेत ...
उन्हाळ कांद्याच्या तयारीत असलेल्या शेतक-याला पुढच्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये येणा-या कांद्याची चिंता आत्तापासूनच लागून राहिली आहे. उत्पादन येईल का आणि आले तर कांद्याला भाव मिळेल काय अशा विवंचनेत असलेल्या कांदा उत्पादक शेतक-याला आकाशात अधून मधून दाटून ...
शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांच्या कायद्यानुसार तीन वर्षांनंतर बदल्या करणे क्रमप्राप्त असले तरी, काही महाभागांना आहे त्याच जागी सुखनैव वाटते व ध्रुवता-याप्रमाणे आपण अढळ असावे अशी त्यांची सुप्त इच्छा. ...
नाशिक जिल्ह्यात आजवर १२३६ कोरोनाबाधित आढळून आले असून, सर्वाधिक रुग्ण मालेगाव शहरात ७७९ इतके, तर नाशिक महापालिका हद्दीत २१८ व नाशिक ग्रामीण भागात १७९ रुग्ण आजवर कोरोनाने पीडित सापडले. ...
गट विकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिका-यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला असून, वर करणी हा वाद अधिकाराचा दिसत असला तरी यामागे पद्धतशीरपणे आरोग्य व्यवस्थाच खिळखिळी करण्याचा हेतू असल्याचे लपून राहिलेले नाही. ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर आजवर देवीदास पिंगळे यांचेच वर्चस्व कायम राहिले. सभापतीपदावर कोणीही असो परंतु त्याचा कंट्रोल आपल्याकडे कायम ठेवण्यात पिंगळे यशस्वी झाले असले तरी, पिंगळे यांचे वर्चस्वाला शह देण्याची तयारी ...