मेघना ढोके. ‘लोकमतसखी.कॉम’च्या संपादक आहेत. पत्रकार-अनुवाद-लेखक अशी त्यांची ओळख. २५ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. कॉन्फ्लिक्ट रिपोर्टिंग’ हा त्यांच्या वार्तांकनाचा विषय आहे. रिपोर्ताज शैलीत सामाजिक विषयावर संशोधनपर लेखन करतात. याशिवाय क्रिकेट, खाद्यसंस्कृती आणि सिनेमासह पॉप्युलर कल्चरचे सामाजिक परिणाम हे त्यांच्या आवडीचे विषय. आसाम एनआरसीविषयी त्यांनी लिहिलेले ‘मोई कुन? आमी कुन?’ हे पुस्तक गाजले आहे. अरुण साधू शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. अरुणाचल प्रदेश आणि चीन यासंदर्भात लिहिलेल्या ‘जो है, वो है,’ या लेखाला आशिया-पॅसिफिक स्तरावरचा एशियन डेव्हलपमेण्ट बॅँकेचा ‘बेस्ट डेव्हलपमेण्ट जर्नलिस्ट ऑफ द इयर’ म्हणजेच ‘डाजा’ हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचसाठी जपान-टोक्यो येथील कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी विशेष फेलोशिपही मिळाली होती. तसेच अमेरिकन सरकारची ‘इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशीप प्रोग्रॅम’ ही विशेष फेलोशिपही मिळालेली असून त्याअंतर्गत ‘मीडिया आणि डेमोक्रसी’ याविषयावरचा अभ्यास त्यांनी केला आहे. पां. वा. गाडगीळ विकासात्मक लेखन पुरस्कारही अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. म्हणूनही त्यांची पुस्तकं गाजलेली आहेत. आय ॲम अ टॅक्सी, सॅक्रेड लीफ, फेलानी, डेमोक्रॅसीज इलेव्हन-भारतीय क्रिकेटची महान गाथा ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं आहेत.Read more
तगडय़ा भारतीय संघाला नमवत बांग्लादेशला पहिलावहिला विश्वचषक जिंकून दिला. बांग्लादेशच्या 19 वर्षाखालील या युवा संघाचा वसीम जाफर बॅटिंग प्रशिक्षक होता. ...
बंगाल, त्रिपुरा, आसाम या राज्यात प्रसादापासून परंपरेर्पयत आणि पोट भरायचं म्हणून धावपळीत खाण्याचं स्वस्त, पौष्टिक खाद्य म्हणून चिडे-चिरे-सिरा अर्थात पोहे सर्रास खाल्ले जातात. हक्काचं पोषण म्हणून दोई-चिरे-सिरा-मुरी-केळी वेगवेगळ्या रूपांत भेटतात. चटक ...
‘खेलो इंडिया’मध्ये मेडल्स घेऊन आलेली ही खेडय़ापाडय़ातली मुलं. जो-तो आणि जी-ती ‘ऑक्सिजन’ला एकच सांगत होते, ‘आपल्याला चान्स भेटला तर त्या चान्सचा इचार करायचा, आणि जीव लावून खेळायचं; येवढंच डोक्यात होतं. आता पुढचं पुढं, लई इचार करत नाही!’ ज्यांची गोल् ...