मेघना ढोके. ‘लोकमतसखी.कॉम’च्या संपादक आहेत. पत्रकार-अनुवाद-लेखक अशी त्यांची ओळख. २५ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. कॉन्फ्लिक्ट रिपोर्टिंग’ हा त्यांच्या वार्तांकनाचा विषय आहे. रिपोर्ताज शैलीत सामाजिक विषयावर संशोधनपर लेखन करतात. याशिवाय क्रिकेट, खाद्यसंस्कृती आणि सिनेमासह पॉप्युलर कल्चरचे सामाजिक परिणाम हे त्यांच्या आवडीचे विषय. आसाम एनआरसीविषयी त्यांनी लिहिलेले ‘मोई कुन? आमी कुन?’ हे पुस्तक गाजले आहे. अरुण साधू शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. अरुणाचल प्रदेश आणि चीन यासंदर्भात लिहिलेल्या ‘जो है, वो है,’ या लेखाला आशिया-पॅसिफिक स्तरावरचा एशियन डेव्हलपमेण्ट बॅँकेचा ‘बेस्ट डेव्हलपमेण्ट जर्नलिस्ट ऑफ द इयर’ म्हणजेच ‘डाजा’ हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचसाठी जपान-टोक्यो येथील कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी विशेष फेलोशिपही मिळाली होती. तसेच अमेरिकन सरकारची ‘इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशीप प्रोग्रॅम’ ही विशेष फेलोशिपही मिळालेली असून त्याअंतर्गत ‘मीडिया आणि डेमोक्रसी’ याविषयावरचा अभ्यास त्यांनी केला आहे. पां. वा. गाडगीळ विकासात्मक लेखन पुरस्कारही अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. म्हणूनही त्यांची पुस्तकं गाजलेली आहेत. आय ॲम अ टॅक्सी, सॅक्रेड लीफ, फेलानी, डेमोक्रॅसीज इलेव्हन-भारतीय क्रिकेटची महान गाथा ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं आहेत.Read more
मितालीने २६ जून १९९९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. काळाचा केवढा मोठा टप्पा. २२ वर्षांचा प्रदीर्घ काळ. या काळाच्या कसोटीवर उतरणं हेच खरंतर तिच्या यशाचं मोठं वैशिष्ट्य आहे.हे यश तिचं एकटीचं असलं तरी तिची गोष्ट मात्र तिच्या एकटीची नाही.. ...
खोटी माहिती पसरवणे कसे रोखायचे, फेक न्यूजला कसा आळा घालायचा, हे आव्हान मोठे किचकट असताना ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सेनारो स्वत:च जाहीर सांगतात की, लस घेतली तर बायकांना दाढी येईल. लस घेणाऱ्याचं मगरीत रूपांतर होऊ शकेल, तेव्हा तुमचं काय ते तुमचं तुम् ...
ख्रिसमसचा सण ऐन तोंडावर असताना लंडनसह सगळ्या देशभरावरच निराशेचं सावट दाटून आलं आहे. आता सगळ्यांसमोर एकच प्रश्न आहे - ‘विल धिस नाइटमेअर एव्हर एण्ड?’ ...
रेनने ब्रिफकेसशी लग्न करण्यामागे नक्की कोणती मानसिक गुंतागुंत आहे हे कळायला अर्थात काही मार्ग नाही मात्र जगभरात माणसं विचित्र मनोवस्थेतून जात असे टोकाचे निर्णय घेताना दिसतात. ...
अरब स्प्रिंगकडे जगाच्या इतिहासात तंत्रज्ञानाचा हात धरून आलेलं नवं पर्व म्हणून पाहिलं जाऊ लागलं. आता त्या साऱ्याला १० वर्षं उलटली. कशी गेली ही १० वर्षं? न्याय, समानताधारित लोकशाही व्यवस्थेचं स्वप्न मध्यपूर्वेतील या देशांनी, तिथल्या तारुण्यानं पाहिलं त ...
नव्या पिढीपासून वास्तव लपवलं, दडपून टाकलं, इतिहास नाकारला, अमूक एकालाच ‘वैरी’ मानत त्या नावाखाली सगळी झाकपाक केली तरी सत्य लपत नाही या वळणावर आता पाकिस्तानी तारुण्य उभं आहे. ...