मेघना ढोके. ‘लोकमतसखी.कॉम’च्या संपादक आहेत. पत्रकार-अनुवाद-लेखक अशी त्यांची ओळख. २५ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. कॉन्फ्लिक्ट रिपोर्टिंग’ हा त्यांच्या वार्तांकनाचा विषय आहे. रिपोर्ताज शैलीत सामाजिक विषयावर संशोधनपर लेखन करतात. याशिवाय क्रिकेट, खाद्यसंस्कृती आणि सिनेमासह पॉप्युलर कल्चरचे सामाजिक परिणाम हे त्यांच्या आवडीचे विषय. आसाम एनआरसीविषयी त्यांनी लिहिलेले ‘मोई कुन? आमी कुन?’ हे पुस्तक गाजले आहे. अरुण साधू शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. अरुणाचल प्रदेश आणि चीन यासंदर्भात लिहिलेल्या ‘जो है, वो है,’ या लेखाला आशिया-पॅसिफिक स्तरावरचा एशियन डेव्हलपमेण्ट बॅँकेचा ‘बेस्ट डेव्हलपमेण्ट जर्नलिस्ट ऑफ द इयर’ म्हणजेच ‘डाजा’ हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचसाठी जपान-टोक्यो येथील कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी विशेष फेलोशिपही मिळाली होती. तसेच अमेरिकन सरकारची ‘इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशीप प्रोग्रॅम’ ही विशेष फेलोशिपही मिळालेली असून त्याअंतर्गत ‘मीडिया आणि डेमोक्रसी’ याविषयावरचा अभ्यास त्यांनी केला आहे. पां. वा. गाडगीळ विकासात्मक लेखन पुरस्कारही अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. म्हणूनही त्यांची पुस्तकं गाजलेली आहेत. आय ॲम अ टॅक्सी, सॅक्रेड लीफ, फेलानी, डेमोक्रॅसीज इलेव्हन-भारतीय क्रिकेटची महान गाथा ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं आहेत.Read more
‘नागरिकत्व सुधारणा विधेयका’वर ईशान्य भारतात खदखदत्या रागाला नव्याने तोंड फुटलं. तो उद्रेक पाहता लोकसभेत मंजूर झालेलं हे विधेयक राज्यसभेत न मांडण्याची खेळी करून भाजपाने एक पाऊल मागे घेतलं असलं, तरी धार्मिक ध्रुवीकरणाचा डाव साधला गेलाच आहे ! आसा ...
आनंद महिंद्रा यांनी केलेलं ट्विट, त्यातलं चित्र पाहून अनेकींना वाटलं असेल, या चित्रात दिसतेय ती मीच! मीच उभी आहे पांढर्या रेषेच्यामागे, रेडी-स्टेडी-गो म्हटलं की पळणारी, धपाधप अडथळ्याची शर्यत पार करणारी, पडणारी-रडणारी-चिडणारी-हरणारी आणि जिंकणारीही! ...
फहमिदा रियाज. ज्येष्ठ पाकिस्तानी लेखिका. तुम बिल्कुल हम जैसे निकले! ही त्यांची जुनी नज्म व्हायरल झाली तेव्हा कराचीस्थित फहमिदा आपांशी ‘लोकमत’ने संपर्क केला, तेव्हा त्या जे म्हणाल्या, तोच हा निरोप. सरहदपारहून आलेला ! ...
तीन मुलांचा संसार सांभाळून बॉक्सिंगसारख्या शारीरिक कस आजमावणा-या खेळात पुन्हा मुसंडी मारणा-या आणि तब्बल सहाव्या विश्वविजेतेपदाला गवसणी घालणा-या एका जिगरबाज खेळाडूचा प्रवास, तिच्याच शब्दात! ...
आसामी माणसाला एकदाचा या बेकायदा स्थलांतराच्या प्रश्नांचा तुकडा पाडायचा आहे. कोण कुणाची व्होट बँक याचा खल करण्यात आता त्यांना रस नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गाने जाऊन का असेना, बेकायदा राहणार्या लोकांची संख्या एकदाची नेमकी कळावीच असा स्थानिक ...
रशिया. पोलादी पडद्यामागचा देश. उत्सुकतेपेक्षा संशय आणि शंकाच अधिक वाटावी असा. साम्यवादाच्या जुन्या झालरींमध्ये आजही वेढलेला असेल अशी जणू खात्रीच वाटणारा. कामाशिवाय जिथे कधी कुणी गेल्याचं वाचा - ऐकायला मिळत नाही असा! फुटबॉल वर्ल्डकपने मात्र हे ...