मेघना ढोके. ‘लोकमतसखी.कॉम’च्या संपादक आहेत. पत्रकार-अनुवाद-लेखक अशी त्यांची ओळख. २५ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. कॉन्फ्लिक्ट रिपोर्टिंग’ हा त्यांच्या वार्तांकनाचा विषय आहे. रिपोर्ताज शैलीत सामाजिक विषयावर संशोधनपर लेखन करतात. याशिवाय क्रिकेट, खाद्यसंस्कृती आणि सिनेमासह पॉप्युलर कल्चरचे सामाजिक परिणाम हे त्यांच्या आवडीचे विषय. आसाम एनआरसीविषयी त्यांनी लिहिलेले ‘मोई कुन? आमी कुन?’ हे पुस्तक गाजले आहे. अरुण साधू शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. अरुणाचल प्रदेश आणि चीन यासंदर्भात लिहिलेल्या ‘जो है, वो है,’ या लेखाला आशिया-पॅसिफिक स्तरावरचा एशियन डेव्हलपमेण्ट बॅँकेचा ‘बेस्ट डेव्हलपमेण्ट जर्नलिस्ट ऑफ द इयर’ म्हणजेच ‘डाजा’ हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचसाठी जपान-टोक्यो येथील कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी विशेष फेलोशिपही मिळाली होती. तसेच अमेरिकन सरकारची ‘इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशीप प्रोग्रॅम’ ही विशेष फेलोशिपही मिळालेली असून त्याअंतर्गत ‘मीडिया आणि डेमोक्रसी’ याविषयावरचा अभ्यास त्यांनी केला आहे. पां. वा. गाडगीळ विकासात्मक लेखन पुरस्कारही अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. म्हणूनही त्यांची पुस्तकं गाजलेली आहेत. आय ॲम अ टॅक्सी, सॅक्रेड लीफ, फेलानी, डेमोक्रॅसीज इलेव्हन-भारतीय क्रिकेटची महान गाथा ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं आहेत.Read more
तांत्रिक नादुरुस्ती लक्षात आल्याने ‘चांद्रयान-2’चं प्रक्षेपण ऐनवेळी स्थगित करावं लागण्याची वेळ इसरोवर ओढवली आणि अनेकांच्या वाटय़ाला निराशा आली. पण इसरोमध्ये मात्र सगळी टीम नव्याने कामाला भिडली आहे आणि चांद्रयान-2 अवकाशात झेपावण्यासाठी उद्याचा मुहूर्त ...
राजकीय नेतृत्वाकडून झालेला अपेक्षाभंग निदान खेळाडूंनी तरी करू नये आणि आपल्या देशाचा डंका वाजवावा अशी अनेकांची अतीव ‘भावुक’ अपेक्षा असते. म्हणून खेळाच्या आनंदाच्या पोटात ‘देश की इज्जत’ पणाला लावली जाते. ...
अफगाणिस्तानातून निर्वासित म्हणून आलेले लोंढे पाकिस्तानात ‘रेफ्यूजी कॅम्प’मध्ये जगले. काहीजण याच कॅम्पमध्ये तरुण झाले, काहीजण तिथंच जन्माला आले. या तारुण्याकडे अन्नपाणी नव्हतं, जगणंच निर्वासित होऊन तुंबलं. मात्र तरीही त्यातल्या काहींनी क्रिकेटचा आणि ...
जवाद शरीफ. एक तरुण पाकिस्तानी फिल्ममेकर. सिंधू नदीच्या खोर्यात एकेकाळी समृद्ध असलेलं संगीत, वाद्यं आणि कलाकार यांच्या शोधात तो फिरलाय. त्याची ‘इंडस ब्ल्यूज’ ही शॉर्टफिल्म सध्या जगभरातल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजली जातेय. ...
भारतीयत्वाची ओळख सांगणार्या क्रिकेटनं अखेर मणिपुरपर्यंत मजल मारली आणि मणिपूरला आपला पहिला क्रिकेट पोस्टर बॉय मिळाला. रेक्स राजकुमार सिंग. एका ट्रक ड्रायव्हरचा हा मुलगा. तो आता भारतीय संघाचं दार ठोठावतोय. क्रिकेटची ही यशोगाथा मणिपूर ला भारताशी ...
एकता कपूरने सरोसगीद्वारे एकल पालकत्व स्वीकारलं आणि त्यानिमित्तानं जी पालकत्वाची चर्चा झाली त्यावरून हे सहज दिसतं की, आपल्या समाजात आणि मनांत पुरुषप्रधान संस्कृती आणि कुटुंबपद्धती किती खोलवर रुजलेली आहे. आणि न बदलेले कायदे आजही कसे समानता आणि लिंग तटस ...