वडिलांच्या लिव्हर शस्त्रक्रियेच्या मदतीसाठी तरूण चढला टॉवरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 07:18 PM2019-09-18T19:18:02+5:302019-09-18T19:32:43+5:30

सहा महिन्यापासून शासनाकडून त्यांना मदत मिळाली नाही.

The young man climbs to the tower demanding help for his father's liver surgery | वडिलांच्या लिव्हर शस्त्रक्रियेच्या मदतीसाठी तरूण चढला टॉवरवर

वडिलांच्या लिव्हर शस्त्रक्रियेच्या मदतीसाठी तरूण चढला टॉवरवर

googlenewsNext
ठळक मुद्देदहा जणांनी दिली रोख २ लाख ३१ हजार रुपयेखा. इम्तियाज जलील यांच्या आश्वासनानंतर  दोन तासानंतर खाली उतरला.

औरंगाबाद: वडिलांच्या लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासनाकडून निधी मिळत नसल्यामुळे आत्महत्या करण्यासाठी टी.व्ही.सेंटर येथील दुरदर्शनच्या टॉवरवर चढलेल्या तरूण खा. इम्तियाज जलील यांच्या आश्वासनानंतर  दोन तासानंतर खाली उतरला. यावेळी उपस्थितांनी त्याला तातडीने २ लाख ३१ हजाराची रोख मदत केली.

मंगेश संजय साबळे (वय २३,रा.गेवराई पायगा, ता.फुलंब्री)असे या तरूणाचे नाव आहे. वडिलांच्या लिवर प्रत्यारोपण  शस्त्रक्रियेसाठी सुमारे २५ ते ३० लाख रुपये खर्चही डॉक्टरांनी सांगितला. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या मंगेश हे एवढी रक्कम जमा करू शकत नाही. यामुळे त्यांनी पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून वडिलांच्या शस्त्रक्रियेकरीता पैसे मिळावे, यासाठी अर्ज केला. एवढेच नव्हे तर त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींची भेट घेऊन शासनाकडून तातडीने निधी मिळवून द्यावा,अशी विनंती केली. मात्र सहा महिन्यापासून शासनाकडून त्यांना मदत मिळाली नाही. परिणामी वडिलांची प्रकृती दिवसेंदिवस अधिक नाजूक होत आहे.

यामुळे त्यांनी १३ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी त्यांची दखल घेतली नाही. यामुळे संतप्त मंगेश बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास टी.व्ही.सेंटर येथील दूरदर्शनच्या टॉवरवर चढून त्याने आत्महत्या करणार असल्याची पत्रके फेकली. याबाबत माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक लोकांनी मोठी गर्दी केली. लोकांनी आवाहन करूनही तो उतरत नव्हता. खा. इम्तियाज जलील यांनी त्याला पूर्ण मदतीचे आश्वासन देत खाली येण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनला प्रतिसाद देत मंगेश तब्बल दोन तासानंतर खाली उतरला. यानंतर सिडको ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी त्याची समजूत काढली.

दहा जणांनी दिली रोख २ लाख ३१ हजार रुपये
मंगेशची अवस्था पाहून अभिजीत देशमुख यांनी एक लाख, बाळासाहेब थोरात  ५१ हजार रुपये, सुदाम सोनवणे  २५ हजार , अनिल बोरसे २५ हजार, बाळासाहेब औताडे   ११ हजार, संदीप फासगे ११ हजार आणि  सुधाकर शिंदे , गणपत खरात , कैलास मुगले , नितेश साळवे यांनी प्रत्येकी एक हजार असे एकूण २ लाख ३१ हजार रुपये मदत दिली.

आरोग्यमंत्र्यांकडून उपचाराची व्यवस्था 
घटनेची माहिती मिळताच आरोग्यमंत्री एकनाथ शिदे यांनी तात्काळ वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांना रुग्णाच्या उपचारासाठी सूचना केल्या. यानंतर चिवटे यांनी लीलावती हॉस्पिटलमध्ये संपर्क साधून गुरुवारी(दि,19) रुग्णास दाखल करून घेऊन तत्काळ उपचार सुरू करण्याची व्यवस्था केली.

Web Title: The young man climbs to the tower demanding help for his father's liver surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.