स्टॉक संपल्याने पैठण तालुक्यात लसीकरणाचे काम थंडावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:05 AM2021-04-11T04:05:17+5:302021-04-11T04:05:17+5:30

पैठण तालुक्यात सात प्राथमिक आरोग्य केंद्र, तीन ग्रामीण रुग्णालये व एका खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. पैठण तालुक्यासाठी ...

Vaccination work in Paithan taluka has come to a standstill due to depletion of stock | स्टॉक संपल्याने पैठण तालुक्यात लसीकरणाचे काम थंडावले

स्टॉक संपल्याने पैठण तालुक्यात लसीकरणाचे काम थंडावले

googlenewsNext

पैठण तालुक्यात सात प्राथमिक आरोग्य केंद्र, तीन ग्रामीण रुग्णालये व एका खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. पैठण तालुक्यासाठी २४,६०० लसींचा पुरवठा करण्यात आला होता. यापैकी १४,१०० प्राथमिक आरोग्य केंद्रावर तर १०,५०० पैठण, बिडकीन व पाचोड ग्रामीण रुग्णालयात पुरवठा करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी युसुफ मणियार व डॉ.भूषण आगाज यांनी दिली. सात प्राथमिक आरोग्य केंद्रावर १३,१४७ नागरिकांना लस देण्यात आली, तसेच शहरातील शासकीय रुग्णालय, बिडकीन, पाचोड रुग्णालय मिळून ९,९४१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान, लसीकरण केंद्रांतील लसीचा साठा संपल्याने, शुक्रवारी दुपारनंतर तालुक्यातील पाच आरोग्य केंद्रांतील लसीकरण बंद करण्यात आले. यामुळे लसीकरण करण्यासाठी आलेेल्या नागरिकांना परत फिरावे लागले.

Web Title: Vaccination work in Paithan taluka has come to a standstill due to depletion of stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.