Udaipur Airlines 'flight' started after 21 years from Aurangabad | औरंगाबादहून २१ वर्षांनंतर उदयपूर विमानसेवेचे 'उड्डाण'
औरंगाबादहून २१ वर्षांनंतर उदयपूर विमानसेवेचे 'उड्डाण'

औरंगाबाद : ऐतिहासिक पर्यटन शहर औरंगाबादेहून तब्बल २१ वर्षांनंतर, आजपासून उदयपूरसाठी विमानसेवा सुरु झाली. सकाळी ७.१५ वाजता विमानाने उदयपूरसाठी उड्डाण केले.

एअर इंडियाकडून मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी या विमानाने औरंगाबादहून अनेक प्रवासी उदयपूरला रवाना झाले.
या विमानसेवेचे चिकलठाणा विमानतळावर वॉटर सॅल्यूट देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे, उद्योजक सुनीत कोठारी, ऋषी बागला, गिरीधर संगनेरिया , मानसिंग पवार, जसवंत सिंह राजपूत, एअर इंडियाचे सेल्स अधिकारी संतोष नायर, स्टेशन मॅनेजर अरुण गलाटे आदी उपस्थित होते.


Web Title: Udaipur Airlines 'flight' started after 21 years from Aurangabad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.