Shop closed for 15 days if goods are given to the customer without mask | विनामास्क ग्राहकास सामान दिल्यास १५ दिवस दुकान बंद

विनामास्क ग्राहकास सामान दिल्यास १५ दिवस दुकान बंद

औरंगाबाद : शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येणार नसून परिस्थिती खूपच हाताबाहेर गेली तर त्याचाही विचार करण्यात येईल. मात्र नियमांचे १०० टक्के पालन करावेच लागेल. विनामास्क ग्राहकाला  सामान दिल्यास संबंधित व्यापाऱ्याचे दुकान १५ दिवसांसाठी बंद करण्यात येईल, असे महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी मंगळवारी सांगितले.

मंगल कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होते आहे. सर्व कार्यालय चालकांना शेवटचे अल्टिमेटम देण्यात येत आहे. शासनाने मंगल कार्यालयात फक्त ५० नागरिकांना परवानगी दिलेली आहे. सध्या कुठे पाचशे तर कुठे हजार नागरिकांच्या उपस्थितीत लग्न सुरू आहेत. पांडेय म्हणाले, बाजारपेठेत नागरिक गर्दी करीत आहेत. रस्त्यावर मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. व्यापाऱ्यांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.शहरातील सर्व मंगल कार्यालयांना शेवटचे अल्टिमेटम देण्यात येत आहे. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येईल.

Web Title: Shop closed for 15 days if goods are given to the customer without mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.