अबब ! औरंगाबादेत एक लाखावर अनधिकृत नळ कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 01:20 AM2020-02-24T01:20:30+5:302020-02-24T01:20:43+5:30

गळती आणि चोरीही मोठी : सर्वाधिक पाणीपट्टी भरणाऱ्या शहराला पुरवठा मात्र तोकडा; उपलब्ध असूनही पाच दिवसांआड मिळते पाणी

Now! One lakh unauthorized tap connections in Aurangabad | अबब ! औरंगाबादेत एक लाखावर अनधिकृत नळ कनेक्शन

अबब ! औरंगाबादेत एक लाखावर अनधिकृत नळ कनेक्शन

googlenewsNext

- ऋचिका पालोदकर

औरंगाबाद : राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी भरणाºया औरंगाबादकरांना पाणी मात्र कमीच मिळते. शहरात अनधिकृत नळांची संख्या जवळपास एक लाखावर असून, पाण्याची गळती तब्बल १० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्यामुळे पाणीपट्टीचे दर वाढविण्याआधी या दोन प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज जलतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

औरंगाबादमध्ये पाणीपट्टीचा दर वर्षाला ४०५० रुपये एवढा असून, तो पुणे- मुंबईपेक्षाही अधिक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक पाणीपट्टी भरणारे शहर म्हणून औरंगाबाद ओळखले जाते. पाणीपट्टी एवढी जास्त असूनही राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत औरंगाबादचा पाणीपुरवठा मात्र अगदीच तोकडा आहे. औरंगाबाद शहराची लोकसंख्या १७ लाखांच्या घरात असून, दररोज शहराला २५० दशलक्ष घनमीटर एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे. यापैकी जायकवाडी धरणातून शहराला १३० दशलक्ष घनमीटर पाणी मिळते. मुख्य पाईपलाईनला अनेक ठिकाणी असलेल्या गळतीमुळे १० दशलक्ष घनमीटर पाण्यावर औरंगाबादकरांना दररोज पाणी सोडावे लागते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेला दरवर्षी अंदाजे ६० कोटी रुपये एवढा खर्च करावा लागतो. शहरातील अधिकृत नळांची कागदोपत्री संख्या १ लाख ३० हजार असली तरी शहरात १ लाखापेक्षा अधिक अनधिकृत नळ कनेक्शन आहेत, तसेच शहराची थकीत पाणीपट्टी ४०० कोटींच्या घरात आहे. पाच दिवसांआड पाणी मिळणारे आणि महाराष्ट्रात सर्वाधिक पाणीपट्टी भरणारे सर्वसामान्य औरंगाबादकर पाण्याची किंमत चांगलीच जाणतात. त्याचवेळी अवैध नळ कनेक्शन घेऊन खुलेआम पाणीचोरी करणारे आणि वरून दमदाटी करणाऱ्यांची संख्याही येथे कमी नाही. त्यामुळे पाणीपट्टी वाढविण्याआधी ही गळती आणि अवैध नळकनेक्शनवर अंकुश आणला जावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून केली जात आहे.

आधी पाणीपुरवठा यंत्रणा प्रभावी करा : औरंगाबाद शहरातील ५० टक्के नळ कनेक्शन अनधिकृत आहेत. त्यामुळे अशा लोकांना आणि दमदाटी करून पाणी घेणाºयांना पाणीदरवाढ लागूच होत नाही. तुम्ही त्यांच्याकडून पाणीपट्टी वसूल करू शकत नाही, त्यांच्याविरुद्ध तुम्ही कायदा वापरत नाही. कोणी अधिकारी त्यांच्याविरुद्ध उभा राहिलाच, तर अन्य लोक त्यांना पाठिंबा देत नाहीत, लगेच त्या प्रकरणावर स्टे आणला जातो. मग पाणीदरवाढ करून उपयोग काय? मुळात पाणीपुरवठा करणारी आपल्या देशातील यंत्रणा प्रभावी नाही. पाण्याचे कोणतेही मोजमाप होत नाही. याची एक योग्य पद्धत जोपर्यंत लागू होत नाही, तोपर्यंत पाणीदरात वाढ करून उपयोग नाही. -डॉ. प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

लोकांमध्ये जागृती वाढणे गरजेचे : १० दशलक्ष घनमीटर पाणी दररोज वाया जाते, असे म्हणता येणार नाही. कारण हा ‘अझ्युम लॉस किंवा टेक्निकल लॉस’ म्हणून गृहीत धरण्यात येतो. जेवढी लांब पाईपलाईन असेल, तेवढा हा लॉस जास्त गृहीत धरतात. पाणीचोरी, अनधिकृत नळ कनेक्शन घेणाºयांवर आम्ही कायम कारवाई करीतच असतो. अनेकदा पोलीस ठाण्यातही तक्रारी दाखल करतो; पण जोपर्यंत यामध्ये लोकसहभाग असणार नाही, तोपर्यंत हे प्रकार असेच चालू राहतील. आपल्या बाजूचा माणूस जर अवैध पद्धतीने नळ घेत असेल, तर ही गोष्ट नगरसेवक, मनपा कर्मचाºयांपर्यंत कळविणे, हे सामान्य नागरिकांचे कर्तव्य आहे; पण या विरुद्ध कोणीही बोलत नाही. हा प्रश्न एकट्या प्रशासनाचा नसून सामाजिक प्रश्न आहे. - हेमंत क ोल्हे, कार्यकारी अभियंता, मनपा

औरंगाबाद शहराची लोकसंख्या 17,00,000
थकीत पाणीपट्टी 400 कोटी
अधिकृत नळांची कागदोपत्री संख्या 1,30,000
पाण्याची शहराला आवश्यकता आहे. 250 दशलक्ष घ.मी.
पाणी शहराला जायकवाडी धरणातून मिळते 130 दशलक्ष घ.मी.
पाण्याची गळती 10 दशलक्ष घ.मी.

Web Title: Now! One lakh unauthorized tap connections in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.