खळबळजनक! प्रेयसीचा खून करून केले तुकडे, विल्हेवाट लावताना प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

By राम शिनगारे | Published: August 17, 2022 02:59 PM2022-08-17T14:59:07+5:302022-08-17T15:00:37+5:30

पोलिसांच्या सोशलमिडिया ग्रुपमध्ये, ' मी खून केला आहे.' असा मेसेज केला होता.

Murder In Aurangabad! The girlfriend was killed and cut into pieces, the boyfriend was taken into custody by the police while disposing of it | खळबळजनक! प्रेयसीचा खून करून केले तुकडे, विल्हेवाट लावताना प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

खळबळजनक! प्रेयसीचा खून करून केले तुकडे, विल्हेवाट लावताना प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext

औरंगाबाद: तीन दिवसांपूर्वी प्रेयसीचा निर्घृणपणे खूनकरून मृतदेहाचे  तुकडे केल्याची खळबळजनक घटना शहरात उघडकीस आली आहे. अंकिता महेश श्रीवास्तव ( रा. जालना) असे मृत महिलेचे तर सौरभ लाखे असे आरोपीचे नाव आहे. लाखेला देवगाव रंगारी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेतले आहे. 

सौरभ लाखे हा शिऊर येथील असून स्थानिक पत्रकार म्हणून काम करतो. विशेष म्हणजे, आज सकाळी त्याने पोलिसांच्या सोशल मिडिया ग्रुपमध्ये 'मी खून केला आहे' असा मेसेज केला होता. याबाबत अधिक माहिती अशी की, सौरभ लाखे आणि अंकिता महेश श्रीवास्तव दोघेही शेजारी राहत असत. त्यांच्यात विवाहबाह्य प्रेम संबंध निर्माण झाले. दरम्यान, सौरभ आणि अंकिता हे काही दिवसांपासून औरंगाबाद येथील हडको भागात भाड्याच्या घरात राहत होते. आज सकाळी घरातून दुर्गंधी येत होती. यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांनी याची माहिती दिली. पोलिसांनी जागेची पाहणी केली असता तिथे मृतदेहाचे तुकडे आढळून आले. स्थानिकांच्या माहितीवरून पोलिसांनी नाकाबंदी केली . यावेळी देवगाव रंगारी पोलिसांच्या तावडीत लाखे सापडला. 

पोलिसांच्या ग्रुपमध्ये केला मेसेज 
दरम्यान, लाखे याने पोलिसांच्या सोशल मिडिया ग्रुपमध्ये , ' मी खून केला आहे.' असा मेसेज केला होता. यामुळे खळबळ उडाली होती. दोघांचे विवाहबाह्य संबंध होते. यातूनच ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे . 

Web Title: Murder In Aurangabad! The girlfriend was killed and cut into pieces, the boyfriend was taken into custody by the police while disposing of it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.