लोकसभेनंतर औरंगाबाद जिल्ह्यात वाढले ३४ हजार ४५६ नवमतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 07:01 PM2019-09-23T19:01:24+5:302019-09-23T19:02:13+5:30

प्रशासनाची उडाली धावपळ 

Maharashtra Assembly Election 2019 : After the Lok Sabha, Aurangabad district has increased to 34 thousand 456 newcomer voters | लोकसभेनंतर औरंगाबाद जिल्ह्यात वाढले ३४ हजार ४५६ नवमतदार

लोकसभेनंतर औरंगाबाद जिल्ह्यात वाढले ३४ हजार ४५६ नवमतदार

googlenewsNext
ठळक मुद्देविधानसभा मतदारसंघनिहाय निर्णय कार्यालय 

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीनंतर राबविण्यात आलेल्या पुरवणी मतदार नोंदणी कार्यक्रमात जिल्ह्यात ३४ हजार ४५६ नवीन मतदार वाढले आहेत. लोकसभेला २८ लाख १५ हजार २९९ मतदार होते. आता २८ लाख ४९ हजार ७५५ मतदारसंख्या नऊ मतदारसंघांसाठी आहे. 

सर्वाधिक मतदारसंख्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात झाली आहे. या मतदारसंघांत ३ लाख ३५ हजार मतदार आहेत. त्याखालोखाल फुलंब्रीत ३ लाख २५ हजार ४९१ तर औरंगाबाद मध्य मतदारसंघात ३ लाख २४ हजार ६६२ मतदारसंख्या आहे. त्यानंतर पूर्व मतदारसंघात ३ लाख १७ हजार ९५८, सिल्लोडमध्ये ३ लाख १६ हजार ९३८ एकूण मतदार झाले आहेत. गंगापूर मतदारसंघात ३ लाख १२ हजार ४०६, वैजापूरमध्ये ३ लाख ९ हजार ४२० तर सर्वाधिक कमी मतदार पैठण विधानसभा मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात २ लाख ९३ हजार ५९९ मतदार आहेत. १ जुलै ते २० जुलै या कालावधीत मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात आला. ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत अंतिम यादीचा मतदार आकडा प्रशासनाने जारी केला आहे. २० दिवसांतच ३४ हजार ४५६ मतदार वाढले आहेत. शहरी मतदारसंघातील मतदार वाढले असून, हे वाढलेले मतदार निवडणुकीच्या काळाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. 
आचारसंहितेचा कालावधी ४५ दिवसांवरून ३५ दिवसांवर आल्यामुळे प्रशासनाची निवडणूक व्यवस्थापनासाठी धावपळ होणार आहे. २०१४ साली ३१ आॅगस्टला आचारसंहिता लागली होती. यावर्षी २१ दिवस उशिरा आचारसंहिता लागली. त्यातच दिवाळीपूर्वीच सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी आयोगाने कार्यक्रम आखला. प्रशासनाची धावपळ होईल.

निवडणूक निर्णय 
कार्यालय : सिल्लोड - उपविभागीय कार्यालय कोर्ट हॉल, कन्नड तहसील कार्यालय, फुलंब्री- मेल्ट्रॉन कंपनी, चिकलठाणा, औरंगाबाद - मध्य शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानपुरा, पश्चिम - शासकीय अभियांत्रिक महाविद्यालय, उस्मानपुरा, औरंगाबाद पूर्व- जिल्हा समादेशक कार्यालय, एन-१२, पैठण- तहसील कार्यालय, गंगापूर - तहसील कार्यालय, वैजापूर- विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर येथे निवडणूक निर्णय कार्यालय असतील. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : After the Lok Sabha, Aurangabad district has increased to 34 thousand 456 newcomer voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.