विधानपरिषद निवडणूक : महिनाभर प्रशिक्षण; तरीही मतमोजणीला झाला उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:50 PM2020-12-04T16:50:38+5:302020-12-04T16:55:12+5:30

Marathwada Graduate Constituency Election : सहायक निवडणूक अधिकारी ते शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत निवडणूक अधिकारी सुनील केंद्रेकर यांना जाहीरपणे मतमोजणीला गती देण्याच्या सूचना कराव्या लागल्या.

Legislative Council elections: month-long training; However, the counting was delayed | विधानपरिषद निवडणूक : महिनाभर प्रशिक्षण; तरीही मतमोजणीला झाला उशीर

विधानपरिषद निवडणूक : महिनाभर प्रशिक्षण; तरीही मतमोजणीला झाला उशीर

googlenewsNext
ठळक मुद्देराज्याने स्वीकारला होता केंद्रेकरांचा व्हिडिओ 

औरंगाबाद : मतमोजणीसाठी प्रशासनाने कर्मचारी, अधिकाऱ्यांचे महिनाभर प्रशिक्षण घेतले; परंतु त्याचा  परिणाम गुरुवारी मतमोजणीत  दिसला नाही. निरक्षराप्रमाणे अधिकारी व कर्मचारी  काम करत असल्याने अनेक चुका होत गेल्या आणि मतमोजणीची गती मंद झाली. 

सहायक निवडणूक अधिकारी ते शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत निवडणूक अधिकारी सुनील केंद्रेकर यांना जाहीरपणे मतमोजणीला गती देण्याच्या सूचना कराव्या लागल्या; परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. राज्यातील इतर निकाल हाती आले; पण येथील निकालाची पहिली फेरीच रात्री ९ वाजता जाहीर झाली. केंद्रेकर यांनी कडक भाषेत वारंवार सूचना करूनही चुका होत गेल्याने विलंब झाला. मतपत्रिका व्यवस्थित न हाताळणे, चुकीच्या मार्किंग करणे यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसले.

मतमोजणी करीत असताना अनेक मतपत्रिकांवर मत वेगवेगळ्या अंकात नोंदविले होते. त्यामुळे मतमोजणी प्रतिनिधी आणि कर्मचारी वर्गात वाद होत गेले. प्रत्येक टेबलवर सहायक निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सांगण्यावरून कुणाचे समाधान होत नव्हते. शेवटी केंद्रेकर यांना तिथे जाऊन समजावून सांगावे लागत होते.  सहायक निवडणूक अधिकारी म्हणून विभागातील पूर्ण जिल्हाधिकारी होते. त्यातील अनेकांना या मतमोजणीचा अनुभव नव्हता. त्यामुळे सगळी तारांबळ उडाली.  रात्री १० वाजून २८ मिनिटांनी दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. या फेरीच्या मतमोजणीला ३ तास लागले. केंद्रेकर यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कडक भाषेत सूचना केल्यानंतर सगळे कामाला लागले.

आठ तास लागले पहिल्या फेरीच्या मतमोजणीला
पहिल्या फेरीच्या मतमोजणीसाठी आठ तास लागले. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. त्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत मतपेट्यांतील मते मिक्सिंग करण्यासाठी वेळ लागला. त्यानंतर मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात वेळ गेला.  उमेदवारांच्या मतपत्रिका वर्गीकरण करण्यासाठी उशीर झाला.

Web Title: Legislative Council elections: month-long training; However, the counting was delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.