सिटीस्कॅनच्या अनाठायी वापरामुळे वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:05 AM2021-04-11T04:05:32+5:302021-04-11T04:05:32+5:30

औरंगाबाद : कोरोना रुग्णांसाठी सिटीस्कॅनच्या अनाठायी वापरामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत आहे. यामुळे इतर उपचारांसाठी येणारे रुग्णही बाधित होत ...

Incidence of corona is increasing due to indiscriminate use of CT scan .... | सिटीस्कॅनच्या अनाठायी वापरामुळे वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव....

सिटीस्कॅनच्या अनाठायी वापरामुळे वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव....

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोना रुग्णांसाठी सिटीस्कॅनच्या अनाठायी वापरामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत आहे. यामुळे इतर उपचारांसाठी येणारे रुग्णही बाधित होत आहेत. कोरोना रोखण्यासाठी लस हाच तूर्तास एकमेव पर्याय असून त्यासाठी प्रचार करणे अधिक गरजेचे असल्याचा सूर राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड

यांच्या कार्यालयावर पार पडलेल्या केंद्रीय पथकासमवेतच्या बैठकीत निघाला.

रुग्ण आणि त्यांचे आप्तेष्ट मोठ्या प्रमाणावर सिटीस्कॅनसाठी आग्रह करीत

असल्याचे बैठकीत उपस्थित डॉक्टर्सकडून सांगण्यात आले. रुग्णांच्या

आग्रहावरून डॉक्टर्स सिटीस्कॅनची शिफारस करतात; परंतु यातून मोठी गर्दी उसळल्याने कोरोनाचा प्रसारच अधिक होत आहे. शिवाय एमआरआय व इतर तपासण्यांसाठी आलेले रुग्णही मोठ्या प्रमाणावर बाधित होत असल्याचे याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले. एकट्या शहरात आतापर्यंत पाच लाखांवर तपासण्या केल्या असून, ग्रामीण भागातही तपासणीची स्थिती उत्तम आहे.

ट्रेसिंगही चांगला असल्याचे केंद्रीय पथकाच्या पाहणीत स्पष्ट झाल्याचे

डॉ. खा. कराड यांनी सांगितले. उपचारासंबंधी तक्रारी असल्याचे त्यांनी

सांगितले. भाजपच्या डॉक्टर आघाडीचे प्रमुख डॉ. यशवंत गाडे यांनी खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याचे स्पष्ट केले. देखभाल दुरुस्तीअभावी ५० व्हेंटिलेटर्स घाटीत बंद असून सिटीस्कॅन मशीनही बंद असल्याने कोरोना रुग्णांना खासगीतून तपासणी करावी लागत आहे. संबंधित इंजेक्शनचा सर्रास वापर टाळावा. याच्या

वापरासंबंधी स्पष्ट दिशानिर्देश नाहीत. ब्लॅकमार्केटमुळे इंजेक्शनचा

तुटवडा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय पथकाचे डॉ. दीपक भट्टाचार्य, डॉ. अभिजित पाखरे, मनपाच्या डॉ. नीता पाडळकर, डॉ. श्याम खंडेलवाल, डॉ. संतोश रंजलकर, डॉ. यशवंत गाडे, डॉ. पी. एन. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

Web Title: Incidence of corona is increasing due to indiscriminate use of CT scan ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.