सत्तेच्या अहंकारात ऐवढे मदमस्त राज्यकर्ते यापूर्वी कधीच पाहिले नाहीत : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 12:58 PM2021-12-04T12:58:09+5:302021-12-04T12:59:46+5:30

Devendra fadanvis: सरकारच्या संवेदना हरवल्या,जनता त्यांना कधीच माफ करणार नाही

I have never seen such a mad ruler in the ego of power: Devendra Fadnavis | सत्तेच्या अहंकारात ऐवढे मदमस्त राज्यकर्ते यापूर्वी कधीच पाहिले नाहीत : देवेंद्र फडणवीस

सत्तेच्या अहंकारात ऐवढे मदमस्त राज्यकर्ते यापूर्वी कधीच पाहिले नाहीत : देवेंद्र फडणवीस

googlenewsNext

औरंगाबाद : विरोधी पक्ष म्हणून सरकारला सहकार्य केलं, तरी देखील सरकार दोन पावले पुढे येण्यास तयार नाही. काल एका एसटी कर्मचाऱ्याचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे सरकार चर्चा करायची सोडून मेस्मा लावण्याची भाषा करत आहे. मला वाटत या सरकारच्या संवेदना हरवलेल्या आहेत, असे सत्तेच्या अहंकारात मदमस्त राज्यकर्ते कधी पाहिले नव्हते, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanavis) यांनी आज केली. ते संघटनात्मक कार्यक्रमासाठी शहरात आले आहेत. 

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले, काल तर मला माहिती मिळाली की एक उपोषण करता कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. हा सरकारचा असंवेदनशीलतेचा कळस आहे. मेस्मा लावायच्या ऐवजी सरकारने चर्चेतून मार्ग काढावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला सहकार्य केले, मात्र सरकार दोन पावले पुढे येण्यास तयार नाही. मला असं वाटतं की सरकारच्या संवेदना हरवलेल्या आहेत.

सत्तेच्या अहंकारात राज्यकर्ते मदमस्त 
नायर हॉस्पिटलमध्ये आग लागली तेव्हा सरकारच्यावतीने कोणी बघायला देखील गेले नाही. आमच्या नगरसेवकांनी आमदारांनी विषय मांडला. त्यानंतर राज्यकर्त्यांना जाग आली आणि त्यानंतर हे बघायला गेले. सत्तेच्या अहंकारामुळे एवढे मदमस्त राज्यकर्ते यापूर्वी कधी पाहिले नाहीत,जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, अशी टीकाही यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली. 

'सामना'चा केंद्रबिंदू गांधी परिवार 
मी पहिल्यांदाच सांगितलं की सामना आणि संपादक यांचे केंद्रबिंदू आता बदललेले आहेत. त्यांचे नेते अलीकडच्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी झाले आहेत. म्हणून मला असं वाटतं की तीच प्रचीती  आता आपल्याला मिळत आहे.

Web Title: I have never seen such a mad ruler in the ego of power: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.