ई-कॉमर्स, एमएसएमईत औरंगाबादला आगामी काळात भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 04:24 PM2020-06-06T16:24:38+5:302020-06-06T17:50:16+5:30

एमएसएमईला विस्तारण्याच्या संधी

The future of Aurangabad in e-commerce n MSME | ई-कॉमर्स, एमएसएमईत औरंगाबादला आगामी काळात भवितव्य

ई-कॉमर्स, एमएसएमईत औरंगाबादला आगामी काळात भवितव्य

googlenewsNext
ठळक मुद्देचीनमधील मराठी उद्योजकांशी संवाद चीनने केलेल्या उपाययोजनांबाबत उद्योजकांना माहिती

औरंगाबाद : एमएसएमई (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक), ई-कॉमर्स सेवेमध्ये औरंगाबादला आगामी काळात भविष्य आहे. सेवा, सुरक्षा, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगसह आॅटोमेशनवर भर देऊन उद्योजकांना पुढे जाता येईल. आयात आणि निर्यातीला चार-सहा महिन्यांनंतर चांगली सुरुवात होईल, अशी अपेक्षा चीनमधील मराठी उद्योजकांनी औरंगाबादमधील उद्योजकांशी शुक्रवारी वेबिनारद्वारे संवाद साधताना व्यक्त केली. 

कोरोनामुळे पूर्ण जग बदलले असून, प्रत्येकाला कोरोनानंतर जग कसे असेल आणि उद्योग, व्यापार, दळणवळण याची चिंता लागून राहिलेली आहे. या सगळ्या संसर्गमय  वातावरणातून बाहेर पडण्यासाठी चीनने काय उपाययोजना केल्या. याबाबत चीनमध्ये स्थित असलेले औरंगाबादचे उद्योजक समीर डोरले आणि नागपूरमधील अमित वायकर यांनी औरंगाबादमधील ७० हून अधिक उद्योजकांशी वेबिनारद्वारे संवाद साधला. 

सीआयआयच्या मराठवाडा झोनचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, रमण अजगावकर, रवींद्र कोंडेकर, रोहित दाशरथे यांच्या वतीने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. ‘लॉकडाऊन आणि चीनचे अनुभव’ या विषयावर या वेबिनारमध्ये येथील उद्योजकांना डोरले आणि वायकर यांनी मार्गदर्शन केले. 
कोरोनामुळे नवीन गुंतवणूक, ग्राहकांची खरेदी-विक्री, आयात-निर्यात ठप्प आहे त्यामुळे आगामी सहा ते आठ महिने उद्योगांसाठी कसे असतील याबाबत चीनने केलेल्या उपाययोजनांवर दोघांनाही माहिती दिली. उत्पादनाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंंग पाळावे लागेल. उद्योगांचे ले-आऊट यापुढे बदलावे लागेल, चीनऐवजी इतर देशांतून आयात करण्याच्या संधी कशा निर्माण होतील, यासाठी येथील एमएसएमईने पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले. 

चीन सरकार सकारात्मक असून, उद्योगांना वीज आणि करसवलती जाहीर केल्या आहेत. आॅटोमेशनवर कंपन्यांनी उत्पादन वाढविले आहे. मार्केटिंग, वितरण, ग्राहकसेवा, पुरवठा या धोरणांवर चीनने लक्ष केंद्रित केल्याचे डोरले यांनी सांगितले. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, गुजरात या राज्यांतील ग्राहक बाजारपेठ मोठी आहे. ही बाजारपेठ नजरेसमोर ठेवून सरकार आणि उद्योजकांना धोरणात्मक काम करावे लागेल, अशी अपेक्षा या वेबिनारमधून व्यक्त झाली. 

सर्व काही हळूहळू पूर्वपदावर येईल 
वाहतूक, पर्यटन, सार्वजनिक वाहतूक या सेवा हळूहळू पूर्वपदावर येतील. आयात- निर्यात पूर्वपदावर येण्यास थोडा उशीर लागणार आहे. इनोव्हेशनवर भर देण्याचा यापुढे सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे. चीनमधील बीअर कंपन्यांनी इम्युनिटी वाढविणारी नॉनअल्कोहोलिक चार उत्पादने लॉकडाऊनमध्ये आणली, तसेच हळद आणि मसाल्यांची आयात वाढविली. ग्राहक वाढण्यासाठी कूपन सेवा, कोरोनावर विजय मिळविला म्हणून रिव्हेंज टुरिझमला चालना दिल्याची उदाहरणे डोरले आणि वायकर यांनी सांगितली. 

Web Title: The future of Aurangabad in e-commerce n MSME

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.