कर्करोग शस्त्रक्रीयेचा पहिला सुपरस्पेशालीटी अभ्यासक्रम औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 08:14 AM2020-07-05T08:14:07+5:302020-07-05T08:15:01+5:30

कर्करोग रुग्णालयात हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी ३ जागांना परवानगी दिल्याची माहीती कर्करोग रुग्णालयाचे विषेश कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. 

The first superspecialty course of cancer surgery in Aurangabad | कर्करोग शस्त्रक्रीयेचा पहिला सुपरस्पेशालीटी अभ्यासक्रम औरंगाबादेत

कर्करोग शस्त्रक्रीयेचा पहिला सुपरस्पेशालीटी अभ्यासक्रम औरंगाबादेत

googlenewsNext
ठळक मुद्दे राज्यात टाटानंतर आता शासकीय कर्करोग रुग्णालयाला मान एमसीएच-सर्जिकल ऑन्कोलॉजीच्या ३ सीटस् ला मान्यता 

- योगेश पायघन 

औरंगाबाद :  शासकीय कर्करोग रुग्णालय अर्थात राज्य कर्करोग संस्थेमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून सर्जिकल ऑन्कोलॉजी हा सुपरस्पेशालीटी कोर्स सुरु करण्यास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) मान्यता दिली आहे. हा कोर्स राज्यात केवळ मुंबईतील टाटा मेमोरीयल हॉस्पीटल मध्ये सुरु होता. त्यानंतर कर्करोग रुग्णालयात हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी ३ जागांना परवानगी दिल्याची माहीती कर्करोग रुग्णालयाचे विषेश कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) किरणोपचार विभागाचे विस्तारीकरण झाल्यावर निर्माण झालेले विभागीय शासकीय कर्करोग रुग्णालयाचे टाटा मेमोरीयल हॉस्पीटलसोबत सामंजस्य करार झाला. डॉ. कैलास शर्मा यांच्या मार्गदर्शनात टाटा हॉस्पीटलच्या तज्ज्ञांना घाटी शासकीय कर्करोग रुग्णालयात येवून त्यांनी येथील अध्यापकांना प्रशिक्षीत केले. ते प्रशिक्षण एमसीआयच्या पाहणीत ग्राह्य धरण्यात आले. आतापर्यंत कॅन्सरच्या मेजर, सुप्रामेजर ४९०० तर मायनर ३४०० सर्जरी करण्याचे मोठे काम या रुग्णालयातकडून पार पडले. वाढता व्याप व चांगल्या कामाची दखल घेवून राज्य शासनाने कर्करोग संस्थेचा दर्जा दिला. या कोर्समुळे घाटीतील सुपरस्पेशालीटी कोर्सची संख्या दोनवर पोहचली. यापूर्वी डीएम न्युओनेटाॅलॉजी हा सुपरस्पेशालिटी कोर्सही घाटीत सुरु झालेला आहे.

गेल्या वर्षीपासून इथे किरणोपचारातील पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम सुरु झाला. वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. सजीव मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहान यांच्या मार्गदर्शनात संचालक शैक्षणिक संचालक टाटा मेमोरीयल हॉस्पीटल मुंबई आणि बोर्ड ऑफ गव्हर्नर्स एमसीआय नवी दिल्लीचे सदस्य डॉ. कैलास शर्मा यांनी कोर्ससाठी वर्षभर पाठपुरावा करुन मान्यता मिळवून दिली. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनात विभागप्रमुख डॉ. अनघा वरुडकर, ऑन्कोसर्जन डॉ. अजय बोराळकर यांनीही या अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मेहनत घेतली. यामुळे संस्थेचे उपचारासोबत मनुष्यबळ निर्मीतीतही योगदान देता येईल. येत्या ऑगस्ट-सप्टेंबरपासून या तीन वर्षाच्या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रीया सुरु होण्याची शक्यता आहे, अशी माहीती डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.

मुंबईनंतर केवळ औरंगाबाद
कर्करोगावर उपचार व संशोधन यासाठी तज्ज्ञ घडवण्यासाठी एमएस सर्जरी नंतरचा सुपरस्पेशाटी कोर्स एमसीएस- सर्जीकल ऑन्कोलॉजी आतापर्यत केवळ टाटा मेमोरीय हॉस्पीटलमध्ये सुरु होता. त्याशिवाय हा कोर्स राज्यातील सर्वच शासकीय व खाजगी संस्थांपैकी केवळ औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरु करण्यासाठी एमसीआयने तीन सिट्सला मान्यता दिली. आता राज्यात केवळ दोनच ठिकाणी हा कोर्स असेल. ही संधी आणि मान ही मिळाला आहे. याचा रुग्णांसह कर्करोग क्षेत्रातील मनुष्यबळ निर्मीतीलाही फायदा होईल.
- डॉ. कैलास शर्मा, संचालक, शैक्षणिक संचालक टाटा मेमोरीयल हॉस्पीटल मुंबई तथा सदस्य बोर्ड ऑफ गव्हर्नर्स एमसीआय नवी दिल्ली.

Web Title: The first superspecialty course of cancer surgery in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.