शेतकऱ्यांचा साखर सहसंचालक कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न; लाठीचार्जनंतर आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 02:31 PM2020-12-04T14:31:35+5:302020-12-04T14:35:40+5:30

गंगापूर साखर कारखान्याचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांनी साखर सहसंचालक कार्यालयावर आज सकाळी आंदोलन केले.

Farmers' attempt to take over the office of the Joint Director of Sugar; Police in riot gear storm a rally on Friday, removing hundreds of protesters by truck | शेतकऱ्यांचा साखर सहसंचालक कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न; लाठीचार्जनंतर आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

शेतकऱ्यांचा साखर सहसंचालक कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न; लाठीचार्जनंतर आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देहातात ऊस व मागण्यांचे फलक हातात असलेल्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

औरंगाबाद : गोठवलेली खाते सुरू करा या मागणीसाठी गंगापूर साखर कारखान्याचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी क्रांतीचौकातील साखर सहसंचालक कार्यालासमोर आंदोलन केले. आंदोलकांनी आक्रमक होत कार्यालयाचा ताबा घेण्याच प्रयत्न केला. पोलिसांच्या बंदोबासातामुळे हे शक्य झाले नाही. यानंतर आंदोलकांनी रस्त्यावर चक्काजाम आंदोलन सुरु केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

गंगापूर साखर कारखान्याचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांनी साखर सहसंचालक कार्यालयावर आज दुपारी आंदोलन केले. हातात ऊस व मागण्यांचे फलक हातात असलेल्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. गंगापूर साखर कारखान्याचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांनी खाती गोठवली आहेत. त्यावरील निर्बंध त्वरित काढावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

यानंतर येथील अधिकारी एस. एम. स्वामी यांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांना खाली येण्याची मागणी केली. स्वामी यांनी खाली येऊन पुण्यामध्ये मागण्यांवर निर्णय होत आहे. जो निर्णय घेण्यात येईल तो तुम्हाला सांगण्यात येईल अशी माहिती दिली.

यावर आंदोलकांनी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही क्रांती चौकात चक्काजाम आंदोलक करू अशी भूमिका घेतली. क्रांती चौकात आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

Web Title: Farmers' attempt to take over the office of the Joint Director of Sugar; Police in riot gear storm a rally on Friday, removing hundreds of protesters by truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.