Entrepreneur dies of electric shock | विजेच्या धक्क्याने उद्योजकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने उद्योजकाचा मृत्यू

औरंगाबाद : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत इमारतीच्या गॅलरीत असताना विजेचा धक्का बसून उद्योजकाचा मृत्यू  झाल्याची  दुर्घटना  रविवारी सकाळी घडली. सुधाकर विक्रम भिसे (४५ वर्षे, साईनगर, बजाज नगर) असे मृत्यू झालेल्या उद्योजकाचे नाव आहे.

कमळापूर गट नं. २२, प्लॉट नं. १ मध्ये साक्षी इंडस्ट्रीज येथे सकाळी नेहमीप्रमाणे ते कारखान्यात गेले होते. गॅलरीत काही अंतरावरून वीज प्रवाह  असलेली तार गेलेली आहे. गॅलरीत असताना वीज प्रवाह असलेल्या तारेला त्यांचा स्पर्श झाला आणि विजेच्या धक्क्याने ते खाली कोसळले.  ही बाब  सकाळी ११: ४० वाजेच्या सुमारास कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर भिसे यांना शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले.  डॉक्टरांनी  १२: १० वा. तपासून त्यांना मृत घोषित केले. 

कारखान्यातील गॅलरीत उद्योजक भिसे नेमके काय करत होते, त्यांना विजेचा धक्का कसा लागला,  याविषयी एमआयडीसी वाळूज  पोलीस  शोध घेत  आहेत. विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: Entrepreneur dies of electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.