औरंगाबाद महापालिकेत शिवसेना- भाजप नगरसेवकांमध्ये घमासान; उपमहापौर औताडे यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:06 PM2019-12-13T13:06:06+5:302019-12-13T13:08:08+5:30

मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन प्रस्तावा दरम्यान महापालिकेत गदारोळ

Divpute between Shiv Sena-BJP corporators in Aurangabad municipal corporation; Deputy Mayor Otade resigns | औरंगाबाद महापालिकेत शिवसेना- भाजप नगरसेवकांमध्ये घमासान; उपमहापौर औताडे यांचा राजीनामा

औरंगाबाद महापालिकेत शिवसेना- भाजप नगरसेवकांमध्ये घमासान; उपमहापौर औताडे यांचा राजीनामा

googlenewsNext

औरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदन प्रस्तावा दरम्यान शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये घमासान झाले. या गोंधळात भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांण्डेय यांच्याकडे राजीनामा सादर केला. 

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. यानंतर शिवसेना आणि भाजप नगरसेवक यांच्यात औरंगाबाद कि संभाजीनगर यावरून जोरदार शाब्दिक चकमक झाली. सभागृहात जवळपास एक तास हा गोंधळ सुरु होता. दरम्यान, भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी आयुक्त आस्तिककुमार पांण्डेय यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. शेवटी या गोंधळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्रीमंडळाचे अभिनंदन करण्यात आले.

Web Title: Divpute between Shiv Sena-BJP corporators in Aurangabad municipal corporation; Deputy Mayor Otade resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.