CoronaVirus: Corona positive contact doctor, caretaker screening at Ghati Hospital begins | CoronaVirus : घाटी रुग्णालयात कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील डॉक्टर, परिचारिकांची स्क्रिनिंग सुरू

CoronaVirus : घाटी रुग्णालयात कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील डॉक्टर, परिचारिकांची स्क्रिनिंग सुरू

ठळक मुद्देसुरक्षा साधने नसल्याने परिस्थिती ओढवल्याचा आरोप

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात गेल्या दोन दिवसात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले त्यात विभागातील ब्रदर ला कोरोना विषाणू संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. या तीन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या निवासी डॉक्टर,परिचारिकांची स्क्रिनिंग घाटी रुग्णालयात सुरू झाली आहे. 

दरम्यान, सुरक्षा साधने न पुरवल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याने मार्ड पदाधिकारी आक्रमक झाले. घाटी प्रशासन व सर्जिकल साहित्य वितरणासंबंधी माहिती घेताना मार्ड पदाधिकारी यांची बाचा-बाची झाली आहे.

अधिष्ठाता डॉ कानन येळीकर म्हणाल्या, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या थेट संपर्कात आलेले व लांबून संपर्कात आलेले अशा दोन्ही लोकांची स्क्रीनिंग केल्या जाणार आहे. थेट संपर्कात आलेल्या परिचारीका, डॉक्टरांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. 

Web Title: CoronaVirus: Corona positive contact doctor, caretaker screening at Ghati Hospital begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.