coronavirus : औरंगाबाद @ ११७९; दिवभरात ६० पॉझिटिव्ह, तीन मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 07:44 PM2020-05-21T19:44:21+5:302020-05-21T19:44:53+5:30

शहरात उपचार घेवून परतणाऱ्यांची संख्या ४९६ झाली असुन सध्या ६४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

coronavirus: Aurangabad @ 1179; 60 positives in a day, three deaths | coronavirus : औरंगाबाद @ ११७९; दिवभरात ६० पॉझिटिव्ह, तीन मृत्यू 

coronavirus : औरंगाबाद @ ११७९; दिवभरात ६० पॉझिटिव्ह, तीन मृत्यू 

googlenewsNext

औरंगाबाद : गुरुवारी सकाळी ५४ बाधित आढळून आल्यानंतर दुपारी आणखी ६ बाधितांचा वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११७९ झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. तर तीन बाधितांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकुण बळींची संख्या ४२ वर गेली आहे. शहरात उपचार घेवून परतणाऱ्यांची संख्या ४९६ झाली असुन सध्या ६४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

शहरातील गरम पाणी १, शिवराज कॉलनी १, कैलास नगर १, सौदा कॉलनी १, रेहमानिया कॉलनी २, आझम कॉलनी ( रोशन गेट ) २, सिटी चौक ६, मकसूद कॉलनी २, हडको ( एन-१२ ) १, जयभीम नगर ११, हुसेन कॉलनी (गल्ली नं.९) १ , खडकेश्वर १,  न्याय नगर (गल्ली न.१८ ) २, हर्सुल कारागृह १, खिवंसरा पार्क ( उल्कानगरी ) २, टाइम्स कॉलनी ( कटकट गेट ) २, मुकुंदवाडी ५, आदर्श कॉलनी १, काबरा नगर १, उस्मानपुरा ३, हुसेन कॉलनी (गल्ली नं. १० ) ४, पडेगाव येथील मीरा नगर ४,  एन-5 सिडको, एन-7 सिडको, पिसादेवी, राम नगर आणि कन्नड तालुक्यातील धनगरवाडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. घाटीत बाह्यरुग्ण विभागात काम करणारी ५० वर्षीय महिला कर्मचारी बाधित झाल्याचे बुधवारी रात्री समोर आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये वाढत चाललेला संसर्ग चिंताजनक बनला आहे.

कोरोनामुळे तिघांचा मृत्यु 
दोन रुग्णांचा कोरोनामुळे बुधवारी (दि. २०) मृत्यू झाला आहे. तर आणखी एका रुग्णाचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाल्याने शहरातील आतापर्यंतच्या बळींचा आकडा ४२ झाला आहे. आसेफिया कॉलनी येथील ४८ वर्षीय व्यक्तीचा तर  रहेमानिया कॉलनीतील ६५ वर्षीय वृद्धाचा या मृत्यूत समावेश आहे. मृत्यूनंतर या दोघांचे अहवाल प्राप्त झाल्याचे घाटीचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले. तर एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या खडकेश्वर येथील  ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

आसेफिया कॉलनी येथील ४८ वर्षीय पुरूषाला मंगळवारी घाटीत भरती करण्यात आले होतेय उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांच्या स्वॅबचा अहवाल बुधवारी सायंकाळी ५.२० वाजता पाॅझीटीव्ह प्राप्त झाला. दोन्ही बाजुंचा न्युमोनीया, कोरोना व हायपरटेन्शनमुळे त्यांचा मृत्यु झाल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे. रहेमानिया कॉलनीतील ६५ वर्षीय वृद्धाला बुधवारी घाटीत दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना काही तासांतच म्हणजे सकाळी सव्वा दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू पश्चात स्वॅब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल पाॅझिटीव्ह असल्याचे रात्री स्पष्ठ झाले. तसेच खाजगी रुग्णालयात गुरुवारी सकाळी अकरा वाजता खडकेश्वर, यशोमंगल सोसायटी येथील कोरोना बाधित ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाला. १८ मे रोजी त्यांना भरती करण्यात आले होते. कोरोनामुळे दोन्ही बाजुंचा न्युमोनिया, रक्तवाहीन्यांतील अडथळ्यांचा आजार आणि श्वसन विकार यामुळे त्यांचा मृत्यु झाल्याचे खाजगी रुग्णालयांच्या डाॅक्टरांनी कळवले आहे.  या मृत्युमुळे शहरातील मृतांची संख्या ४२ झाली आहे.

Web Title: coronavirus: Aurangabad @ 1179; 60 positives in a day, three deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.